Share

मराठवाड्यातील विद्यार्थी प्रचंड मेहनती योग्य दिशा मिळाल्यास ते उत्तम कामगिरी करतील-  कुलगुरू डॉ. प्रमोद येवले

Published On: 

औरंगाबाद : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने चालणाऱ्या विद्यापीठाला ऐतिहासिक परंपरा आहे. विद्यापीठ ही एक समाजाची फार मोठी अपेक्षा असणारी संस्था असते. विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजे अशी आम्हा सर्वांची प्रामाणिक भावना आहे. मराठवाड्यातील विद्यार्थी प्रचंड मेहनती व गुणवंत असून त्यांना योग्य दिशा मिळाल्यास ते नक्कीच उत्तम कामगिरी करू शकतात. हे वेळोवेळी सिद्ध झाल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वर्ग अधिकार्‍यांची आढावा बैठक व्यवस्थापन परिषद कक्षात गुरुवारी (दि.१५) घेण्यात आली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. शाम शिरसाठ, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना ते म्हणाले, विद्यार्थी, कर्मचारी, शिक्षक व समाज या चारही घटकांना सोबत घेऊन गेल्या दोन वर्षात सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विद्यापीठाला पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. सर्वांच्या सहकार्यातून विद्यापीठाची प्रतिमा व नावलौकिक उंचावण्याचा प्रयत्न करू असेही ते म्हणाले. प्रारंभी कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या द्विवर्षपूर्ती निमित्त अधिकाऱ्यांतर्फे सत्कार करण्यात आला.

कोरोना नंतरची बदललेली परिस्थिती लक्षात घेऊन बदल केले जातील असेही ते म्हणाले. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाची वाटचाल अत्यंत योग्य दिशेने सुरू आहे. रेल्वे ट्रॅक बदलताना जसा खडखडाट होतो तसा अनुभव सुरुवातीला आला आता मात्र विद्यापीठाने प्रगतीच्या दिशेने टेक-ऑफ केले आहे. येणाऱ्या काळात विद्यापीठाची प्रतिमा उंचावली जाईल असे उद्गार प्रकुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ यांनी यावेळी काढले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!