Share

‘मुख्यमंत्र्यांना दिलीप कुमारांच्या घरी जाता येते पण लोणकर कुटुंबीयांच्या नाही ; हे तर निबर कातडीचे सरकार’

Published On: 

मुंबई : एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने स्वप्नील लोणकर या तरुणाने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरही 2 वर्षे मुलाखत झालीच नाही आणि स्वप्नील लोणकर हळूहळू नैराश्यात गेला. या काळात घरची परिस्थिती आणि परीक्षेनंतर नोकरी लागेल या आशेवर घेतलेलं कर्ज यांसारख्या कारणांमुळेही स्वप्नीलवरील तणाव वाढत गेला. त्याच्या संयमाचा कडेलोट झाला आणि त्याने अखेर आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं होते.

त्यामुळे मागील काही दिवसांपासून याचे पडसाद राज्यभर उमटलेले पाहायला मिळत आहे. अनेक राजकीय नेतेमंडळी स्वप्नीलच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबियाची विचारपूस करत आहेत. त्यानंतर स्वप्नीलच्या कुटुंबियांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ‘आम्ही सगळे तुमच्या सोबतच आहोत. घटना दुर्देवी आहे. पण धीराने घ्यावे लागेल, काळजी करू नका,’ अशा शब्दांत स्वप्नीलच्या कुटुबियांना धीर दिला.

स्वप्नील लोणकरचे आई, वडील आणि बहिण यांनी आज सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वप्नीलचे आई, वडीलांचे सांत्वनही केले. तसेच स्वप्नीलची बहिणीला करता येईल, ती सर्व मदत केली जाईल, असे आश्वस्तही केले. तिचे शिक्षण आणि पात्रतेनुसार तिला रोजगार संधी उपलब्ध करून देता येईल. यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले आहेत.

परंतु स्वप्नीलच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहावर यावं लागले यावरून विरोधकांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र डागायला सुरुवात केली आहे. हे संवेदना हरवलेलं सरकार आहे, अशा शब्दात भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे.

ट्वीटरच्या माध्यमातून ट्वीट करून त्यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘अरेरे, दुर्दैवी स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना अखेर मुख्यमंत्र्याना भेटायला सह्याद्री अतिथीगृहात जावं लागलं.ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनानंतर त्यांच्या घरी जाऊन सांत्वन केले तसे स्वप्नीलच्या घरी जाता आले नसते का? हे तर निबर कातडीचे सरकार, संवेदना हरवलेले सरकार’ अशा आशयाचे ट्वीट करून त्यांनी टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!