Share

‘त्या’ व्हायरल व्हिडिओमुळे राष्ट्रवादी आणि भाजप आमनेसामने

Published On: 

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होता आहे. त्यात एक महिला पोलीस एका तरुणाला बेदम मारहाण करत आहे. ही घटना वडाळा रेल्वे स्थानकावरील आहे. तो तरुण महिला पोलिसाची छेड काढत होता म्हणून त्या महिला पोलिसाने तरुणाला मारले अशी माहिती समोर येत आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत या घटनेचा निषेध नोंदवला आहे. ‘पोलिसांनी असे मारणे योग्य नाही ही घटना अमानवीय आहे. पोलिसांवर कारवाई करा’ अशी प्रतिकिया व्यक्त केली.

https://twitter.com/Awhadspeaks/status/1415752615745495056

तर दुसरीकडे भाजपच्या चित्रा वाघ यांनी देखील या उलट ट्विट करीत म्हंटले की, ‘हा व्हिडिओ 2 दिवसांपासून व्हायरल होत आहे, ज्यामध्ये महिला पोलिस एका युवकाला मारहाण करताना दिसते, यावरुन बरीच चर्चा रंगली. व्हिडीओचे सत्य हे आहे की हा मुलाग सायन रेल्वे स्थानकापासून महिला पोलिसांची छेड काढत होता. त्या महिला पोलिसांनी याची माहिती वडाळा रेल्वे पोलिसांना दिली.

तरुण वडाळा येथे उतरल्यानंतर पोलिसांनी त्याला बाजूला घेतले आणि त्याला मारहाण केली. या घटनेविषयी गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. मला तुम्हा सर्वाना आवाहन करायचे आहे की अशी घटना तुमच्या नजरेत आल्यास त्या महिलेची मदत करा. दर्शक नाही मदतगार व्हा’ अशा प्रतिक्रिया चित्र वाघ यांनी व्यक्त केली.

यावर सध्या समाज माध्यमांवर चर्चा रंगली आहे. चित्र वाघ याचे कौतुक होत आहे तर आव्हाड यांना ट्रोल केलं जात आहे. ‘आव्हाड राजीनामा द्या’ असे हॅशटॅग सुद्धा चालवण्यात येत आहे. या प्रकरणावर भाजप आणि राष्ट्रवादी आमनेसामने आलेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!