सोलापूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे २९ जून रोजी इंदापूरमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी ‘काँग्रेस पक्षात एकेकाळी माझ्या शब्दाला किंमत होती. आता ती राहिली आहे का माहिती नाही, अशी खंत सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली होती. यामुळे काँग्रेसमध्ये शिंदे यांचे वर्चस्व कमी झाले की काय अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, आता भाजप नेत्यानेच शिंदे यांचे राजकारणातील महत्त्व अधोरेखित केले आहे.
त्याचे झाले असे की, सोलापुरातील दोन ज्येष्ठ पत्रकारांच्या निवृत्ती कार्यक्रमात माजी मंत्री तथा भाजप नेते सुभाष देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी सुभाष देशमुख यांनी सुशिलकुमार यांचे जाहीरपणे कौतुक केले.
‘शिंदे हे सोलापूरचे राजकीय बाप आहे. बापाचे वय झाले तर पोराला वाटते की आत काय बापाचे ऐकायचे. पण बाप हा बापच असतो. बापाचा एक सल्ला मुलाच्या आयुष्याला घडवू देऊ शकतो’, अशा शब्दात देशमुख यांनी शिंदे यांचे राजकीय महत्त्व विशद केले. ‘तुम्ही राजकारणातील बाप माणूस आहे. राजकारणात तुमच्या शब्दाला मोठा मान आहे’ असेही देशमुख म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- जितेंद्र आव्हाडांविरुद्ध शिवसेनेच्या नेत्यांची मुख्यमंत्री ठाकरेंकडे तक्रार
- ‘दहावीची परीक्षा म्हणजे करिअरचा एक महत्त्वपूर्ण टप्पा’, धनंजय मुंडेंकडून शाबासकीची थाप
- ‘जे काँग्रेस नेते भाजपला घाबरतात त्यांना पक्षातून हाकलून द्या’, राहुल गांधींची सडेतोड भूमिका
- ‘इस शहर में मिल ही जाएँगे, हर मोड़ पर गड्ढे-तालाब..’ अमृता फडणवीस यांचा शिवसेनेवर निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

