Share

‘गो कोरोना गो’ नाऱ्यानंतरही कोरोना झाल्याचं म्हणत आता रामदास आठवलेंनी दिला नवा नारा

Published On: 

पुणे : २०१९ च्या अखेरीस कोरोना व्हायरसचे विविध देशांमध्ये रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली होती. यानंतर २०२० च्या फेब्रुवारीनंतर जगभरात कोरोना संसर्गाने थैमान घातले होते. यानंतर, अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट देखील आली. भारतात कोरोनाच्या पहिल्या लाटेहून दुसऱ्या लाटेमुळे अधिक मनुष्यहानी झाली.

दरम्यान, कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिलेला ‘गो कोरोना गो’ हा नारा चांगलाच व्हायरल झाला होता. याबाबत कोणी गाणी काढली तर कोणी मिम्स बनवून ते व्हायरल केलं. आता रामदास आठवले यांनी पुण्यात पत्रकरांशी बोलताना नवा नारा दिला आहे.

”गो कोरोना गो’ म्हणत होतो. मात्र, मलाच कोरोना झाल्याने मी आता ‘नो कोरोना नो’ म्हणतो,’ असं आठवलेंनी भाष्य करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला होता. पुढे त्यांनी कोरोना काळातील कामासाठी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि प्रशासनाचे कौतुक केले. ‘कोरोनाची परिस्थिती हाताळताना पुण्याचे महापौर, उपमहापौर व पालिका प्रशासनाने चांगली कामगिरी केली आहे. मोठ्या प्रमाणात योजना आखल्या. बेड, ऑक्सिजन, औषधे मिळवून दिले, रुग्णालय उभे केले.’ असं कौतुक रामदास आठवले यांनी केलं.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!