लातूर: जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे तसेच निलंगा तालुक्यात कोरोनामुळे गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनामुळे अनेक रुग्ण दगावले आहेत तसेच कोरोना रुग्णांची संख्या देखील तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथील प्रशासन अनेक उपाययोजना करत असले तरी देखील येथील परिस्थिती नियंत्रणात आली नाहीये.
नगरपालिका कोरोना नियंत्रणासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमध्ये कमी पडती आहे का असा सवाल इथे उपस्थित होत आहे. निलंग्यातील परिस्थिती पाहून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने तात्काळ उपाययोजना कराव्यात नाही तर आपल्या पदाचा राजीनामा देऊ, असा इशारा काँग्रेसचे नगरसेवक विकास नाईकवाडे यांनी दिला आहे.
निलंगा शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. दररोज मृत्यूचे आकडे समोर येत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत नगरपालिकेने नागरिकांमध्ये जनजागृती करणे, कंटेन्मेंट झोन तयार करणे, संपर्कातील नागरीकांची तपासणी करणे, गृह विलगीकरणातील रुग्णांच्या अडचणी जाणून घेणे आवश्यक असताना नगरपालिकेकडून असे कुठलेच पाऊल उचलले जात नाही, असा आरोप विकास नाईकवाडे यांनी केला आहे.
तालुक्यातील गंभीर परिस्थिती नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या कानावर घालूनही त्यांनी दखल घेतली नसल्याचे नाईकवाडे यांनी सांगत तात्काळ प्रभाग दोन मधील वाढती रुग्ण संख्या पाहता प्रत्येक घरी जाऊन चाचणी करावी. आवश्यक त्या ठिकाणी कंटेन्मेंट झोन तयार करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्याधिकाऱ्यांना करत दोन दिवसात मागणी पूर्ण नाही झाली तर नगरसेवक पदाचा राजीनामा देऊ, असा इशारा नाईकवाडे यांनी निवेदनात दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘या मंत्राना गोळ्या घातल्या पाहिजे’; निलेश राणेंचा घणाघात
- नंदुरबारमधील भाजप नेत्याच्या हॉटेलमध्ये हजारो रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा : नवाब मलिक
- ‘लस घेतलेल्या वारकऱ्यांना चैत्री वारीसाठी परवानगी द्या’, कीर्तनकार महासंघाची मागणी
- मोठा पडदा गाजवल्यानंतर बॉलीवुडचा ‘सिंघम’ ओटीटीवर पदार्पणासाठी सज्ज
- ‘नवाब मलिकांनी आता तरी तोंड काळे करावे’, भाजपच्या अतुल भातकळकरांचे आव्हान


