Share

मोठा पडदा गाजवल्यानंतर बॉलीवुडचा ‘सिंघम’ ओटीटीवर पदार्पणासाठी सज्ज

Published On: 

मुंबई : ९०च्या दशकापासुन विविध भूमिकेद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा बॉलीवूडचा यशस्वी अभिनेता अजय देवगण हा ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘रुद्र द एज ऑफ डार्कनेस’ या नावाची एक नविन ड्रामा सीरीज द्वारे अजय प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

सिंघम, गंगाजल यासारख्या चित्रपटात पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकरलेला अजय या सीरीजमध्येही एका सक्षम पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या सीरीजची निर्मीती सुरु आहे. या सीरीजचे चित्रीकरण हे मुंबईतील बऱ्याच प्रेक्षणीय स्थळी होणार आहे. या मालिकेचे कथानक हे ब्रिटीश मालिका ‘लूथर’ वर प्रेरीत आहे. ही एक वेगळी कॉप स्टोरी असेल ज्याची कथा आणि कथेचे स्वरुप खूप वेगळे असेल.

या मालीकेद्वारे अजय ‘रुद्र’च्या अवतारात मोठा धमाका करणार आहे. अजयला या थ्रिलर आणि क्राईम ड्रामात पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक झाले आहेत. अजय देवगण सध्या मैदान चित्रपटाचे चित्रीकरण करत होता. मात्र कोरोना संसर्गामुळे लॉकडाउन सुरु आहे त्यामुळे चित्रीकरण सध्या थांबलेले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!