मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले असून रुग्ण अक्षरशः तडफडून जीव सोडत असल्याचे दिसून येत आहे. तर दुसऱ्या बाजूला राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक गलिच्छ राजकारण करण्यात दंग असल्याचे दिसून येत आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करण्यावरुन राज्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन बेड्स, इतर औषधे उपलब्ध नसल्याने कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असतानाच राज्यातील राजकारण चांगलच पेटलं असताना आता दरम्यान, आज अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत भाजप आणि भाजपच्या नेत्यावर मोठा आरोप केला आहे. भाजपचे नेते शिरीष चौधरी नंदुरबारमधील हॉटेलमध्ये हजारो इंजेक्शनचा साठा असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. कोणाच्या परवानगी नंदुरबारमध्ये रेमडेसिवीरची इंजेक्शन वाटली, असा सवाल देखील मलिक यांनी केला. यावेळी त्यांनी FDA ने नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून चौकशी करण्यास सांगितलं आहे, अशी माहिती दिली.
‘महाराष्ट्र भाजपचे नेते ५० हजार रेमडेसिवीर आणू असा दावा करु लागले. मात्र, परिस्थिती वेगळी होती. महाराष्ट्रामध्ये एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून रेमडेसिवीरचा साठा त्यांच्या गोदामात उपलब्ध झाला होता. कंपनी चालवणारे एक भाजपचे नेते आहेत. मागच्या काळात जळगाव अंबरनेर मधून अपक्ष निवडून आले होते. २०१९ मध्ये भाजपच्या तिकीटावर लढले आणि हरले. नंदूरबारमध्ये त्यांच्या हिरा एक्सिक्यूटीव्ह या हॉटेलमध्ये हजारो वाईल्सचा साठा केला होता. त्याचे फोटो देखील त्यांनी उघड केले,’ असं मलिक यांनी सांगितले आहे.
तसचे ‘FDA ने नंदूरबार जिल्हा अधिकाऱ्यांना पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करण्यास सांगितलं आहे. तीन दिवस आधी मी आपल्याकडे तुटवडा असताना ज्या निर्यात करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांना कॉल केला असता ते द्यायला तयार नाहीत. कुठेतरी आमची अडवणूक केली जात आहे, असं म्हटलं होतं. ब्रुक फार्माला महाराष्ट्राच्या FDA ने पत्र दिल्यानंतर केंद्रशासित प्रदेश दिव दमण च्या FDA ने सांगितलं की तुम्हाला महाराष्ट्राला इंजेक्शन देता येत नाहीत. बहुतांश ही कंपन्या दिव दमणला आहे किंवा गुजरातला आहे, तिथल्या FDA ने तुम्हाला देता येत नाही सांगितलं. मी मुद्दा उपस्थि केल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आणि तुटवडा दूर करण्यासाठी आश्वासनं दिली. आम्ही राजकारणासाठी आणला नव्हता. भाजप नेते सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत,’ असं देखील यावेळी मलिक म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘लस घेतलेल्या वारकऱ्यांना चैत्री वारीसाठी परवानगी द्या’, कीर्तनकार महासंघाची मागणी
- धक्कादायक! नऊ महिन्यांत महाराष्ट्रात १०२ पत्रकारांचा कोरोनाने मृत्यू
- ‘आमदार निधीतील एक कोटी घ्या; पण ऑक्सिजन व रेमडेसिविर द्या’
- संतापजनक! घरासमोर येऊन इशारे केल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या
- आ.गायकवाड यांच्या समर्थकांनी हल्ला केल्याचा आ.संजय कुटेंचा आरोप


