मुंबई – राज्यात सध्या जनतेला कुणी वाली आहे की नाही असा सवाल उपस्थित करण्यासारखी परिस्थिती निर्माण होत आहे. एका बाजूला कोरोनामुळे सर्वसामन्यांचे जगणे मुश्कील बनले आहे तर दुसऱ्या बाजूला रेमडेसिवीर इंजेक्शनच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करून खिंडीत पकडण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.
रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाची चौकशी केली होती. या चौकशीवरून माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं होतं. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवरही टीका केली होती. फडणवीस आणि भाजपा नेत्यांकडून करण्यात आलेल्या टीकेवरून मलिक यांनी पलटवार केला आहे.
मलिक म्हणाले, रेमडेसिवीरचा तुडवडा असताना गुजरात भाजप कार्यालयात याचे फुकट वाटप होतं. गंभीर परिस्थिती असताना विरोधक राजकारण करण्यात मग्न आहेत. भाजप कार्यालयात रेमडेसिवीरचा साठा आहे. ब्रुक फार्माच्या रेमडेसिवीरचा काळा बाजार करण्याची तयारी होती. भाजप पदाधिकाऱ्याकडे रेमडेसीविरचा बेकायदेशीर साठा होता, असा आरोपही त्यांनी केला.
भाजपने केवळ राजकारण करण्यासाठी हा विषय समोर आणला नाही. आवाज उठवल्यानंतर केंद्राने मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला, असेही ते म्हणाले. रेमडेसिवीरच्या बाबतीत केंद्राकडून अडवणूक होत आहे, असे म्हणत असताना क्रिस्टल कंपनीचा कारभार उघड करणार, असा इशाराही दिला.
नवाब मलिक सारखे ठाकरे सरकार मधले भिकार मंत्री रोज उठून फालतू राजकारण करत आहेत पण ग्रामीण भागांमध्ये ही भयावह परिस्थिती रोज बिकट होत चालली आहे. या मंत्राना गोळ्या घातल्या पाहिजे, रोज उठून गरज नसलेल्या गोष्टी मीडियासमोर बोलून महाराष्ट्राची दिशाभूल करतायेत. pic.twitter.com/982bFS5emO
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) April 20, 2021
दरम्यान, आता मलिक यांच्यावर भाजपनेते निलेश राणे यांनी टीका केली आहे. नवाब मलिक सारखे ठाकरे सरकार मधले भिकार मंत्री रोज उठून फालतू राजकारण करत आहेत पण ग्रामीण भागांमध्ये ही भयावह परिस्थिती रोज बिकट होत चालली आहे. या मंत्राना गोळ्या घातल्या पाहिजे, रोज उठून गरज नसलेल्या गोष्टी मीडियासमोर बोलून महाराष्ट्राची दिशाभूल करतायेत असे राणे म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘नवाब मलिकांनी आता तरी तोंड काळे करावे’, भाजपच्या अतुल भातकळकरांचे आव्हान
- …म्हणून अजित पवार नाराज, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार भूमिका ?
- ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’मुळे जाग्या झाल्या ‘वॉटर एक्सप्रेस’च्या आठवणी
- माजी मंत्री संजय कुटे यांच्या गाडीवर दगडफेक, बुलढाण्यात तणाव वाढला
- …आणि लेक वामिकाला आपल्या छातीशी घट्ट धरलं; पहा आई आणि लेकीचा क्युट व्हिडीओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

