Share

‘लस घेतलेल्या वारकऱ्यांना चैत्री वारीसाठी परवानगी द्या’, कीर्तनकार महासंघाची मागणी

Published On: 

जळगाव : वर्षभरापासून देश आणि राज्यात कोरोनाचे संकट आहे. कोरोनामुळे गेले वर्षभर वारकऱ्यांची पंढरीची वारी चुकली आहे. पंढरी हे वारकऱ्यांचे माहेर आहे. त्यामुळे कोरोना लस घेतलेल्या ४५ वर्षापुढील वारकऱ्यांना यंदा नवीन वर्षाच्या पहिल्याच चैत्री वारीला शासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचे प्रमुख व वारकरी फडकरी कीर्तनकार महासंघाचे अध्यक्ष रवींद्र महाराज हरणे यांनी केली आहे.

वारकरी संप्रदायामध्ये आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री वारीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. चैत्री पाडव्यापासून राज्यातील मंदिरे दर्शनासाठी शासनाने बंद ठेवली आहेत. त्यामुळे आम्हाला पांडुरंगाचे प्रत्यक्ष पदस्पर्श दर्शन होणार नाही. परंतू चंद्रभागेचे स्नान, कळसाचे दर्शन व नगर प्रदक्षिणा करता येईल.

गेली वर्षभर राज्यातील भजन, कीर्तन, प्रवचन, श्री ज्ञानेश्वरी सप्ताह, भागवत सप्ताह आदी कार्यक्रम शासनाने कोरोनाच्या नावाखाली बंद केले आहेत. ज्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आहे शिवाय लस घेतलेल्या वारकऱ्यांना खासगी वाहनाने चैत्री वारीची परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!