मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले होते. ‘केंद्र सरकारकडून रेमडेसिवीर निर्यातीवर बंदी घातली गेल्याने भारतातील १६ निर्यातदारांना स्वतःकडे असलेल्या २० लाख रेमडेसिवीरच्या कुपी विकायला परवानगी मिळत नाही आहे, असं नवाब मलिक यांनी म्हटलं होतं. तसंच, केंद्र सरकारने महाराष्ट्रात रेमडेसिवीर औषध पुरवठा करण्यास बंदी घातली आहे. जर कंपन्यांनी हे रेमडेसिवीर दिले तर त्या कंपन्यांचे परवाना रद्द केले जातील अशी धमकी त्यांना देण्यात आली आहे, असा गंभीर आरोप मलिक यांनी केला होता. मलिक यांच्या आरोपांनंतर राज्यातील वातावरण तापलं होते.
यानंतर आता भाजप नेते अतुल भातकळकर यांनी एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी एका वृत्तवाहिणीच्या बातमीचा हवाला देत म्हटले आहे की, अन्न व औषध विभागाचे मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी रेमडेसिवीरबाबत भाजपचे त्यांच्याशी बोलणे झाले होते. हा स्टॉक राज्य सरकारसाठीच मागवला होता हे त्यांनी कबूल केले असा दावा भातकळकर यांनी केला आहे. त्यामुळे खोटे आरोप करणाऱ्या नवाब मलिकांनी आता तरी तोंड काळे करावे असे आव्हान भातकळकर यांनी केले आहे.
मलिक आता तरी तोंड काळे करा…
नवाब मलिकांनी रेमदेसीवीर वरून केलेले आरोप भाजपा द्वेषातून केले होते ही बाब मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या विधानावरून स्पष्ट झाली आहे. रेमदेसीवीरबाबत भाजपाने त्यांच्याशी बोलणे केले होते, हा स्टॉक राज्य सरकार साठीच मागवला होता हे त्यांनी कबूल केले. pic.twitter.com/lq4eL7z1aD— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 20, 2021
मलिक यांनी केवळ भाजप द्वेषातून काही आरोप केले आहेत. पण ते आता तोंडघशी पडलेत अशी टीका भातकळकर यांनी केलीय. ‘डॉ.राजेंद्र शिंगणे यांचे मनापासून अभिनंदन. त्यांनी रेमडेसिवीरचे सत्य सांगितल्यामुळे नवाब मलिक, प्रियांका वाडरा, साकेत गोखले, आव्हाड या सगळ्या खोटरड्यांचे पितळ उघडे पडले’ असेही ट्विट त्यांनी केलेय.
दरम्यान, नवाब मलिक यांनी केंद्र सरकारच्या विरोधात असंतोष निर्माण केला. राज्याचे मंत्री असूनही केंद्राच्या विरोधात असंतोष निर्माण करून घटनात्मक चौकटीला नुकसान पोहोचवले. कोरोनाच्या महासाथीत अफवा पसरवली तसेच जनतेत भीती निर्माण केली. त्यांच्या या अपराधाबद्दल राज्य सरकारचे घटनात्मक प्रमुख म्हणून राज्यपालांनी नवाब मलिक यांची सरकारमधून हकालपट्टी करावी अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- धक्कादायक! नऊ महिन्यांत महाराष्ट्रात १०२ पत्रकारांचा कोरोनाने मृत्यू
- ‘आमदार निधीतील एक कोटी घ्या; पण ऑक्सिजन व रेमडेसिविर द्या’
- संतापजनक! घरासमोर येऊन इशारे केल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या
- आ.गायकवाड यांच्या समर्थकांनी हल्ला केल्याचा आ.संजय कुटेंचा आरोप
- ५० लाखांचा विमा बंद, कोरोना योद्ध्यांना मिळणार नवे कवच
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

