भंडारा – काँग्रेसच्या नेतृत्वावर निशाणा साधत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्याकडून सातत्याने युपीएचं नेतृत्व बदलाची वक्तव्य करत आहेत. युपीएचं नेतृत्व शरद पवार यांनी करावे, असं ते सातत्याने म्हणत आहेत. त्यावरून काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान,याच मुद्द्यावरून आता कॉंग्रेस आणि शिवसेना यांच्यात जुंपली आहे. काँग्रेसने राऊत यांची ही मागणी फेटाळून लावली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राऊत नेमके कुणाचे प्रवक्ते आहेत हे त्यांनी जाहीर करावं, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, शिवसेना आणि कॉंग्रेसमध्ये शीतयुद्ध सुरु असताना आता या वादात राष्ट्रवादीने देखील उडी घेतली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता प्रवीण कुंटे पाटील यांनी पटोले यांना चांगलेच खडेबोल सुनावले होते.नाना पटोले यांनी तारतम्य ठेवून बोलावं अशी अपेक्षा आहे. पवार साहेबांमुळेच आज काँग्रेस राज्यात सत्तेमध्ये आहे, याचे भान त्यांनी ठेवावे. उगाच धमक्या देण्यापेक्षा सत्तेच्या बाहेर पडून दाखवाच. मग कळेल सर्व’, असे म्हणत कुंटे पाटलांनी थेट नाना पटोले यांना लक्ष्य केले आहे.
दरम्यान,माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, आज भंडारा येथे बोलताना पटोले यांना याबाबत विचारले असता कोण प्रवीण कुंटे? मी ओळखत नाही, अशी प्रतिक्रिया पटोले यांनी आज येथे दिली. दरम्यान,पुढे संजय राऊत यांचा समाचार घेताना ते म्हणाले,‘आमच्या नेत्या सोनिया गांधी यांच्याबद्दल राऊत सातत्याने वक्तव्य करत आहेत. याआधी देखील शिवसेना युपीएचा घटक नसल्याने त्यांनी याबाबत बोलू नये असं सांगितलं. पण तरीही ते सातत्याने आमच्या नेत्यांवर टीका करत आहेत. आता त्यांना आम्ही सांगितलं आहे की, आम्ही सरकार नाही पण सरकार आमच्यामुळे आहे,’ असं सूचक भाष्य करत नाना पटोले यांनी महाविकास आघाडी सरकारच्या स्थिरतेची आठवण करून दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- काँग्रेसचा पवारांकडे कानाडोळा ? केंद्रातील काँग्रेस नेत्यांनी पवारांची विचारपूसच केली नाही !
- ‘मागील वर्षी थाळ्या हि वाजवल्या व “कोमट पाणी” ही प्यायले, पण आता…’; मनसेची खोचक टीका
- लॉकडाऊनमुळे राष्ट्रवादीत बिनसलं? आता प्रफुल्ल पटेल यांचाही विरोध
- लॉकडाऊननंतरच राबवणार जम्बो लसीकरण मोहीम
- देशातील टॉप-१० कोरोना हॉटस्पॉट जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्राच्या ‘या’ आठ जिल्ह्यांचा समावेश !


