दिल्ली : देशभरात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. पश्चिम बंगालसह ५ राज्यांमध्ये निवडणुकीचा धुरळा उडत असून लाखोंचा जनसमुदाय प्रचार सभांसाठी एकत्र येत आहे. मात्र दुसरीकडं, महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे.
दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्रालयातर्फे देशातील टॉप-१० कोरोना हॉटस्पॉट जिल्ह्यांची आज घोषणा करण्यात आली आहे. ऍक्टिव्ह रुग्णांमध्ये पुणे जिल्हा अव्वल आहे. पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, बेंगलोर अर्बन, नांदेड, दिल्ली आणि अहमदनगर या दहा जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक ऍक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली आहे.
There are 10 districts across the country that have the most number of active cases – Pune, Mumbai, Nagpur, Thane, Nashik, Aurangabad, Bengaluru Urban, Nanded, Delhi and Ahmednagar: Union Health Secretary Rajesh Bhushan#COVID19 pic.twitter.com/SkbzfPHgy6
— ANI (@ANI) March 30, 2021
राज्यात पुनःश्च लॉकडाऊन ?
रुग्णसंख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स आणि इतर आरोग्य सुविधाही अपुऱ्या पडू लागल्या आहेत. राज्यातील अनेक शहरांत बेड्सची संख्या अपुरी पडू लागले आहेत. याच धर्तीवर रविवारी झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
सध्या लॉकडाऊन होणार की नाही ? याबाबत जनतेच्या मनात संभ्रम अधिक वाढत आहे. तर गेल्या लॉकडाऊनमुळे विस्कटलेली आर्थिक घडी अद्यापही सामान्य वर्गाला नीट करता आलेली नाही. अशातच पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याने काहीशी भीती निर्माण झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- काँग्रेसचा पवारांकडे कानाडोळा ? केंद्रातील काँग्रेस नेत्यांनी पवारांची विचारपूसच केली नाही !
- ‘मागील वर्षी थाळ्या हि वाजवल्या व “कोमट पाणी” ही प्यायले, पण आता…’; मनसेची खोचक टीका
- लॉकडाऊनमुळे राष्ट्रवादीत बिनसलं? आता प्रफुल्ल पटेल यांचाही विरोध
- ‘…आता तरी रहस्य कथेचा शेवट करा’; शाह-पवारांच्या भेटीवर संजय राऊतांच भाष्य
- ‘बांगलादेश स्वातंत्र्यसंग्रामातील सैनिक म्हणून मोदींना गौरवाचा ताम्रपट मिळायला हवा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

