दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना काल ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं समोर आलं आहे. यानंतर, महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत अनेक नेत्यांनी पवारांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे.
दरम्यान, तपासण्या झाल्यानंतर त्यांना कालच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून बुधवारी ३१ मार्च रोजी एन्डोस्कोपी व शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. यामुळे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सोशल मीडियासह फोनद्वारे विचारपूस केली असली तरी केंद्रातील काँग्रेस नेत्यांना मात्र त्यांचा विसर पडल्याचं दिसून येत आहे.
शरद पवार व काँग्रेस यांचे खूप जुने संबंध आहेत. यासोबतच युपीएमधील महत्वाचे नेते म्हणून त्यांना देशभरात ओळखलं जातं. मात्र, गेल्या काही दिवसांपासून युपीए अध्यक्ष बदलावरून केंद्रातील काँग्रेस नेते व पवारांमध्ये तणाव निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. ज्यांनी ज्यांनी पवारांची विचारपूस केली त्यांचे ट्विटरमार्फत पवारांनी आभार मानले आहेत. तर, विचारपूस करणाऱ्यांच्या ट्विटमध्ये खासदार राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांचा देखील समावेश नसल्याचं समोर आलं आहे.
यामुळे, पवार आणि काँग्रेसच्या हायकमांडमध्ये सगळं आलबेल नसल्याच्या चर्चांना आता उधाण आलं आहे. दुसरीकडं, भाजपकडून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर या दिल्लीतील नेत्यांसह राज्यातील सर्वच नेत्यांनी पवारांची चौकशी केली आहे. मात्र, काँग्रेससोबत राजकीय प्रवासाची सुरुवात करणाऱ्या, काँग्रेस सरकारच्या काळातच केंद्रीय मंत्रिपदाचा पदभार सांभाळणाऱ्या पवारांचा काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना आता विसर पडल्याचं दिसून येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- बांगलादेश दौर्यादरम्यानच्या मंदिर भेटीवरून तृणमूलकडून मोदींवर आचारसंहिता भंग केल्याची तक्रार
- आसाम विधानसभा निवडणूकीमध्ये आठवलेंचे १० उमेदवार रिंगणात
- लॉकडाऊनमुळे राष्ट्रवादीत बिनसलं? आता प्रफुल्ल पटेल यांचाही विरोध
- ‘…आता तरी रहस्य कथेचा शेवट करा’; शाह-पवारांच्या भेटीवर संजय राऊतांच भाष्य
- ‘बांगलादेश स्वातंत्र्यसंग्रामातील सैनिक म्हणून मोदींना गौरवाचा ताम्रपट मिळायला हवा


