Share

‘मागील वर्षी थाळ्या हि वाजवल्या व “कोमट पाणी” ही प्यायले, पण आता…’; मनसेची खोचक टीका

Published On: 

मुंबई : नव्या कोरोना रुग्णांचा राज्यातील वाढता आकडा पाहता आता याचा ताण आरोग्य यंत्रणांवर येऊ लागला आहे. रुग्णसंख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स आणि इतर आरोग्य सुविधाही अपुऱ्या पडू लागल्या आहेत. राज्यातील अनेक शहरांत बेड्सची संख्या अपुरी पडू लागले आहेत. याच धर्तीवर रविवारी झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

सध्या लॉकडाऊन होणार की नाही ? याबाबत जनतेच्या मनात संभ्रम अधिक वाढत आहे. तर गेल्या लॉकडाऊनमुळे विस्कटलेली आर्थिक घडी अद्यापही सामान्य वर्गाला नीट करता आलेली नाही. अशातच पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याने काहीशी भीती निर्माण झाली आहे.

आता मनसेने देखील लॉकडाऊनला विरोध केला आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी महाराष्ट्रातील लॉकडाऊन बाबत एक ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सामान्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. ‘लॉकडाउन से डर नही लगता है, गरिबी से लगता है मागील वर्षभर आपण सर्वच जण अनेक प्रकारच्या अडचणी ना सामोरे जात आहोत. पण खरी अडचण होते ती गरीब लोकांची , ज्यांना रोज काम केल्याशिवाय पर्याय नाही. जनतेने मागील वर्षात सरकार चे निर्देश कडकपणे पाळले, थाळ्या हि वाजवल्या व “कोमट पाणी” हि प्याले. परंतु आपल्या राज्यात जी कोरोना वाढ झाली त्याचे गूढ उकलेना.’ असा टोला नांदगावकर यांनी लगावला आहे.

यसोबतच, ‘तिथे बंगाल, तामिळनाडू मध्ये सर्व नियम पायदळी तुडवून लाखोंच्या प्रचार सभा चालू आहे तिथे कसा कोरोना वाढत नाही? तसेच राज्यात उच्चभ्रू लोकांनी पब मधे वारंवार सर्व नियमाचा फज्जा उडविला आणि लॉक डाउन चा मार कोणाला बसतोय?’ असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

पुढे त्यांनी लॉकडाऊन करणार असलाच तर सामान्य आणि गरीब परिवाराला रोख २० हजार रुपये द्यावे अशी मागणी देखील केली आहे. ‘तर सर्व सामान्य जनतेला. आधीच लाखो लोक बेरोजगार झाले आहेत, आता लोक हा आर्थिक ताण अजिबात सहन करू शकत नाही. सरकार ने खुशाल लॉक डाउन करावे पण सामान्य व गरीब परिवाराला रोख 20000 रुपये द्यावे व मग लावा कि लॉकडाउन.’ असं भाष्य बाळा नांदगावकर यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!