Share

लॉकडाऊनमुळे राष्ट्रवादीत बिनसलं? आता प्रफुल्ल पटेल यांचाही विरोध

Published On: 

मुंबई : राज्यात कोरोनाने हाहाकार माजला आहे. राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला असून राज्याची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने सुरु झाली आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक लॉकडाऊन लावण्याच्या दृष्टीने नियोजन करा, अशी सूचनाही केली आहे. यावर भाजपानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने लॉकडाऊनला कडाडून विरोध केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व खासदार प्रफुल्ल पटेल यांनी लॉकडाऊनला विरोध केला आहे. ‘जनता आधीच लॉकडाऊनला कंटाळली आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लावणे हा पर्याय नव्हे,’ असे पटेल म्हणाले आहेत.

गोदिंयातील एका पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले कि ‘राज्याला पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही. त्यामुळे अन्य पर्यायांचा विचार व्हायला हवा. जर लोकांनी नियम पाळले तर लॉकडाऊन टाळता येऊ शकतो,’ असेही यावेळी पटेल म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनी लॉकडाऊनला विरोध केला होता. ‘राज्यात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत असल्याने लॉकडाऊनचा विचार करण्यात येत आहे. पण लॉकडाऊन हा अंतिम पर्याय होऊ शकत नाही. तसा आग्रहच आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्यात आला आहे,’ असं नवाब मलिक म्हणाले होते.

तर दुसरीकडं, ग्रामविकास मंत्री तथा अहमनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे नगर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेण्यासोबतच कोव्हीड नियमांचे काटेकोरपणे पालन करावे यासाठी सूचना दिल्या होत्या. यानंतर लॉकडाऊन बाबत बोलताना ते म्हणाले, ‘लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय आहे. अशीच संख्या वाढत गेली तर संक्रमण साखळी तोडण्यासाठी ते अतिशय आवश्यक आहे.’ असा इशाराच मुश्रीफ यांनी दिला होता.

त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्येच लॉकडाऊन लावण्यावरून दोन मतप्रवाह असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!