Share

कृपाशंकर सिंह कोण आहेत ? त्यांचा पक्षप्रवेश भाजपसाठी खरंच लाभदायक ठरेल का ?

Published On: 

मुंबई – महाराष्ट्राचे माजी गृह राज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांनी मुंबईत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते. कृपाशंकर सिंह यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकल्यानंतर त्यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश केला नव्हता. २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. तसंच जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेचा विरोध केला होता आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. दरम्यान, आज देवेंद्र फडणवीस यांनी कृपाशंकर सिंह यांचं स्वागत करत त्यांचा प्रवेश हा पक्षातील नसून एका विचारधारेतून दुसऱ्या विचारधारेत झालेला प्रवेश असल्याचं म्हटलं आहे.

मुंबईत उत्तर भारतीयांच्या मतांची टक्केवारी 20 ते 25 टक्के आहे. मुंबईतील अनेक मतदारसंघात उत्तर भारतीयांची मते निर्णायकही आहेत. या उत्तर भारतीय मतदारांमध्ये कृपाशंकर सिंह यांची लोकप्रियता आहे. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास त्याचा भाजपला फायदाच होणार असून काँग्रेसला मोठा झटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोण आहेत कृपाशंकर सिंह ?

कृपाशंकर सिंह यांचे वडील जौनपूरमधले स्वातंत्र्यसैनिक होते. कृपाशंकर सिंह 1971ला उत्तर प्रदेशातल्या जौनपूरमधून मुंबईला कामाच्या शोधात आले होते. काही छोटे मोठे व्यवसाय करत आपले बस्तान मुंबईत बसवल्यानंतर कृपाशंकर सिंह यांनी झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांच्या समस्यांकरिता आवाज बुलंद करायला सुरुवात केली. काही दिवसांनंतर कृपाशंकर सिंह यांना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना भेटण्याची संधी मिळाली. त्यांच्या बोलण्यावरून त्यांनी राजकारणात प्रवेश केल्याचं म्हटलं जातं. उत्तर भारतीयांची मतं काँग्रेसकडे वळवण्यात कृपाशंकर सिंग यांचा वाटा मोलाचा मानला जातो.

काँग्रेसच्या सत्ताकाळात 2004 साली कृपाशंकर सिंह हे राज्यमंत्री होते. 2009 साली विधानसभा निवडणुकीत मुंबईत काँग्रेसला चांगलं यश मिळालं होतं. त्याचं बहुतांश श्रेय कृपाशंकर सिंग यांना जातं, असं मानलं जातं. मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद, आमदार, राज्यमंत्री, अशी पदं काँग्रेसमध्ये कृपाशंकर सिंह यांनी भूषवली आहेत. पुढे कृपाशंकर सिंह यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याचा आरोप करण्यात आला.

आरोपानुसार, 1999 मध्ये आमदार बनल्यानंतर त्यांचं उत्पन्न प्रति महिना 45 हजार झालं. पण 1999 ते 2014 पर्यंत त्यांनी मोठ्या प्रमाणात संपत्ती खरेदी केली. सुमारे 320 कोटींची संपत्ती त्यांच्या तसंच त्यांच्या नातेवाईकांच्या नावाने आहे. या प्रकरणी त्यांच्यावर मुंबईच्या निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फेब्रुवारी 2018 मध्ये विशेष कोर्टानं मात्र त्यांचं हे प्रकरण पुढे चालवू नये असं म्हटलं त्यामुळे हे प्रकरण मागे पडले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!