Share

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भाजपने नेमकं काय कमावलं आणि काय गमावलं ?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा काल समारोप झाला. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाच्या ठरावावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचे दिसून आलं. सभागृह स्थगित झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात घातलेल्या गोंधळावरून विरोधी पक्षाचे १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. १ वर्षासाठी हे निलंबन असणार आहे.

या सर्व प्रकारानंतर सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. सत्ताधाऱ्यांनी हे सगळं नियोजनबद्ध पद्धतीने घडवून आणल्याचा आरोप होत आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा प्रलंबित असल्यानेच भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन केले असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत देखील याचा फायदा मिळू शकेल असं सांगितले जात आहे. त्यामुळे भाजपने या अधिवेशनात काय कमावले याची चर्चा होण्यापेक्षा भाजपने या अधिवेशनात काय गमावले याची जास्त चर्चा होणे आवश्यक आहे.

जनतेचे प्रश्न मांडताना सभागृहात सदस्य आक्रमक होतात, अनेकदा भावना अनावर होऊन काही अनुचित प्रसंगही घडतात जे स्वाभाविक आहे. लोकप्रतिनीधी म्हणून मर्यादांचं भान ठेवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. पीठासीन अधिकाऱ्यांची प्रतिष्ठा जपली पाहिजे. भाजप आमदार हे काल अत्यंत आक्रमक झाले होते.यातूनच त्यांनी पीठासीन अधिकाऱ्याच्या दालनात त्यांनी गोंधळ घातला. पण आता हीच आक्रमकता भाजपला नडली असल्याचे दिसून येत आहे.

अधिवेशनात जो काही प्रकार झाला त्याचा आगामी काळात फटका भाजपला तर फायदा हा महाविकास आघाडीला होणार हे निश्चित आहे. बाकी काही फायदा झाला नाही तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आत्मविश्वास मात्र वाढणार हे आता स्पष्ट दिसत आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत भाजपचे 106 आमदार होते. त्यापैकी 12 आमदारांचं वर्षभरासाठी निलंबन करण्यात आलं आहे. त्यामुळे आता भाजपचा आकडा हा 94 वर आला आहे. दुसरीकडे अपक्ष आमदारांचा आकडा मिळून आज घडीला भाजपकडे 100 च्या आसपासच आमदार आहेत. अशावेळी जर भाजपला एखादी मोठी खेळी करायची असेल तर किमान 44-45 आमदारांची गरज भासू शकते. त्यामुळे या अधिवेशनात अत्याधिक आक्रमक होणे भाजपला चांगलेच महागात पडू शकते असे देखील राजकीय जाणकारांनी सांगितले आहे.

सोमवारी निलंबित करण्यात आलेल्या १२ भाजपा आमदारांचे निलंबन मागे घेण्याच्या मोबदल्यात राज्यपालांनी विधान परिषदेतील १२ आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा करावा अशी एका हाताने द्या दुसऱ्या हाताने घ्या पद्धतीची भूमिका राज्य सरकार घेऊ शकतं अशी शक्यता व्यक्त केली जातेय. या मुद्द्यावरून देखील भाजपला एक पाऊल आता मागेच घ्यावे लागेल असे दिसत आहे. १२ आमदारांच्या नियुक्त्यांचा प्रश्न प्रलंबित ठेवत भाजपने महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांचा विधिमंडळातील प्रवेश रोखला होता आता महाविकास आघाडीने भाजपच्या दिग्गज नेत्यांचे निलंबन करून पलटवार केला असं चित्र दिसू लागले आहे.

भास्कर जाधव यांच्या रूपाने एका नेत्याला मोठे करण्याचे श्रेय देखील भाजपलाच जाणार आहे. भाजप आमदारांच्या वर्तनाचा गवगवा करून महाविकास आघाडी भाजपची प्रतिमा आणखी मलीन करण्याचा प्रयत्न करणार हे देखील नाकारता येणार नाही. त्यामुळे या अधिवेशनात भाजपने काय कमावले हे सध्या सांगता येणार नाही मात्र गमावले बरेच काही आहे हे मात्र निश्चित.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!