मुंबई : कालपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली होती. पावसाळी अधिवेशनाचे दोन्ही दिवस वादळी ठरले. काल भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन केल्यापासून भाजप आमदारांनी सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला होता. आज तर विधीमंडळाच्या आवारात भाजपने अभिरूप विधानसभा थाटत वेगळं कामकाज केलं. यावर देखील तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी आक्षेप घेत माईक व स्पीकर जप्त करण्यास सांगितले.
दरम्यान, पावसाळी अधिवेशन हे अवघ्या दीड दिवसात गुंडाळण्यात आलं असून पुढील (हिवाळी) अधिवेशन हे नागपूर येथे ७ डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. अधिवेशनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन अधिवेशन काळातील मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.
गेल्या काही दिवसांमधील भेटीगाठींवरून व महाविकास आघाडीतील वाढलेला तणाव पाहता सरकारबाबत प्रश्न निर्माण केले जात आहेत. अशातच, शिवसेना आणि भाजपची युती पुन्हा होऊ शकते अशी कुजबुज देखील सुरु झाली आहे. भाजपच्या युतीबाबत आज उद्धव ठाकरे यांना प्रश्न करण्यात आला. यावर उद्धव ठाकरे यांनी ‘जे तीस वर्षात झालं नाही ते आता काय होणार ?’ असं उत्तर दिलं. यामुळे तूर्तास तरी त्यांनी शिवसेना-भाजपच्या युतीला पूर्णविराम दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘आंदोलक शेतकरी आपले दुश्मन आहेत का? ते पाकिस्तानातून आलेत काय?’, भुजबळांचा केंद्राला सवाल
- कृपाशंकर सिंह यांचा भाजप प्रवेश शिवसेना-कॉंग्रेससाठी धोक्याची घंटा
- ‘…अन्यथा ठाकरे सरकारमधील मंत्र्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही’; बावनकुळेंचा इशारा
- …अन् उद्धव ठाकरेंसमोरच अजित पवार म्हणाले, ‘शिवसैनिक असूनही त्यांनी फिजिकल काही केलं नाही’
- शेतक-यांच्या हिताचे रक्षण करणारी कृषी सुधारणा विधेयके विधानसभेत सादर – बाळासाहेब थोरात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

