औरंगाबाद : पैठण विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्याच्या तिकीटावर २०१९ ची निवडणूक लढवणारे दत्तात्रय राधाकिसन गोर्डे यांनी शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. भुमरे यांनी पदाचा गैरवापर करत त्यांच्या मुलाला आणि पैठणच्या माजी नगराध्यक्षाच्या पत्नीला शासकीय भुखंड दिला असल्याचा आरोप गोर्डे यांनी केला आहे. या प्रकरणाची आपण लाचलुचपत विभागाकडे लेखी तक्रार केली असल्याचेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
या संदर्भात पैठण शहरातील सिटी सर्वे नंबर १०२६ या जमीनीचा नोटरीकृत करारनामा करुन शासनाची जमीन हडपण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे गोर्डे यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर, या प्रकरणात पुढे तक्रार आल्याने ‘सर्वांसाठी घरे-२०२२’ या शासनाच्या धोरणाचा गैरवापर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही जमीन अधिकृत करण्यासाठी सदरील जमीनवर पंचनाम्यामध्ये वेगवेगळ्या कब्जाधारकांची नावे नमूद करण्यात आली आहे. मात्र, त्यातही मंत्री भुमरे यांच्याच नातेवाईकांच्या नावे दाखवण्यात आली असल्याचे गोर्डे यांनी म्हटले आहे.
या संपूर्ण प्रकरणाची आपण तक्रार केली असून यात मंत्री संदीपान भुमरे, विलास भुमरे, सोमनाथ परदेशी, ललीता परदेशी तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी आणि तहसिलदार यांची चौकशी करण्याची मागणी केली असल्याचे गोर्डे यांनी सांगितले. या प्रकरणात सखोल चौकशी करुन कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक आणि विरोधी पक्ष नेत्यांनाही पत्र पाठवले असल्याचे ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- पालखीस परवानगी नाकारली, महाराजांचा वारकर्यांसहित आत्मदहनाचा इशारा!
- कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत १ लाख बाधित, तर तिसऱ्या लाटेत तीन लाखांच्यावर कोरोना बाधित होणार?
- शहर, ग्रामीण पदाधिकाऱ्यांसह भाजपचे औरंगाबादेत आंदोलन, राज्य सरकारच्या कारवाईचा निषेध
- हरित औरंगाबाद! मनपा करणार डेन्स फॉरेस्ट पद्धतीने एक लाख झाडांची लागवड
- दलित,मुस्लिम,मराठा आणि ओबीसींच्या प्रश्नांवर रिपब्लिकन पक्षाचा आझाद मैदानात एल्गार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

