Share

कोण आहे ग्रेटा थनबर्ग? ट्रम्प-पुतीनशीही घेतलाय पंगा; आता ठरतेय वादग्रस्त

Published On: 

मुंबई : आपल्या ट्विटने भारतातील शेतकरी आंदोलनाकडे अवघ्या जगाचे लक्ष वेधणारी, भारतातील कृषी कायद्यांना विरोधासाठी थेट कृती आराखडा शेअर करणारी ही मुलगी आहे तरी कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अवघ्या 17 वर्षांची ग्रेटा थनबर्ग काही दिवसांपूर्वी फक्त पर्यावरण कार्यकर्ती म्हणून जगभरात प्रसिद्ध होती. पण आता भारतातील कृषी कायद्यांच्या विरोधामुळे तिला नवी ओळख मिळाली आहे.

कोण आहे ग्रेटा थनबर्ग?
स्वीडनच्या स्टॉकहोल्ममध्ये राहणाऱ्या ग्रेटाने पर्यावरण वाचवण्यासाठी शाळा सोडली. ग्रेटा थनबर्गची आई मालेना एर्नमन एक ऑपेरा गायिका आहेत, तर तिचे वडील स्वन्ते थनबर्ग एक अभिनेते आहेत. तिचे पूर्वज असलेले स्वन्ते रेनिअस यांना 1903 मध्ये रसायनशास्त्रासाठी नोबेल पुरस्कारदेखील मिळालेला आहे. हवामान बदलाकडे जागतिक नेत्यांचे लक्ष वेधण्यासाठी तिने संघर्ष केला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यावरण चळवळीचा ती मुख्य चेहरा बनली.

सर्वात आधी मे 2018 मध्ये ग्रेटा थनबर्ग चर्चेत आली. तेव्हा ती केवळ 15 वर्षांची होती. तिथल्या स्थानिक दैनिकात ग्लोबल वार्मिंगवर निबंध लिहून तिने पहिलं पारितोषिक जिंकलं होतं. यानंतर तीन महिन्यांनी ग्रेटा थनबर्गने स्वीडनच्या संसदेच्या बाहेर निदर्शने सुरू केली. यात स्विडिश सरकारने हवामान बदलांवरील 2015च्या पॅरिस कराराच्या अटींची पूर्तता करावी, अशी तिची मागणी केली. एका हातात होर्डिंग घेऊन मोठमोठ्याने घोषणा देणारी ग्रेटा तेव्हा अवघ्या जगाने पाहिली. त्या फोटोमुळे ग्रेटाची बातमी अवघ्या जगात पसरली. झालं, येथून पुढे ग्रेटाच्या त्या आंदोलनाला जागतिक स्वरूप मिळू लागलं. पाहता-पाहता ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिका, बेल्जियम, यूके अशा विविध देशांमधून ग्रेटा थनबर्गला समर्थन मिळू लागलं. तिने यानंतर अख्ख्या युरोपमध्ये आंदोलन पेटवलं.

संयुक्त राष्ट्रांत प्रभावी भाषणाने जिंकली मने
सप्टेंबर 2019 मध्ये ग्रेटा थनबर्गने संयुक्त राष्ट्राच्या मंचावरून जोरदार भाषण केले. तिने संयुक्त राष्ट्राच्या परिषदेत उपस्थित दिग्गज जागतिक नेत्यांना उद्देशून थेट सवाल केले. ग्रेटा म्हणाली, तुमची हिंमतच कशी होते? मी इथल्याऐवजी शाळेत असायला हवे होते. तुमच्या भूलथापांनी, पोकळ शब्दांनी माझे बालपण हिरावले आहे.

टाइमच्या मुखपृष्ठावर, आता नोबेलसाठी चर्चा
ग्रेटा थनबर्गला तिच्या पर्यावरणावरील कार्यासाठी टाइम मॅगझिन पर्सन ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. आता ग्रेटा थनबर्गचे नावही नोबेल शांतता पुरस्कारांसाठीही चर्चेत आहे.

ट्रम्प, पुतीनशीही पंगा
जागतिक परिषदा, संमेलने यामध्ये पर्यावरणावर आवाज उठवण्यासाठी ग्रेटाने वर्षभर शाळा सोडली होती. जगभरातील विद्यार्थ्यांना या मुदद्यावर एकत्र आणण्यासाठी तिला ओळखले जाते. ग्रेटाचे पर्यावरणावरील प्रेम एका प्रसंगातून लक्षात येईल, संयुक्त राष्ट्राच्या हवामानावरील परिषदेत सहभागी होण्यासाठी तिने विमानाने प्रवास नकार दिला. त्याऐवजी तिने बोटीने जाणे पसंत केले.
ग्रेटा थनबर्गने जगभरातील बरीच प्रसिद्धी मिळवली. परंतु अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, आणि रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांना मात्र नाराज केले आहे. डोनाल्ड ट्रम्प ग्रेटामुळे चिडले होते. थनबर्गने संयुक्त राष्ट्रांत केलेल्या भाषणानंतर ट्रम्प म्हणाले होते की, ग्रेटाने आपल्या रागावर नियंत्रण ठेवायला शिकले पाहिजे. तर ब्लादिमीर पुतीन म्हणाले होते की, बिचाऱ्या मुलीला अजून पूर्ण माहिती नाही.

दिल्ली पोलिसांत एफआयआर
आता भारतातील शेतकरी आंदोलनात ग्रेटाने लक्ष घातले आहे. यासाठी तिने भारत सरकारचा पद्धतशीरपणे कसा विरोध करायचा, याची रूपरेषाच एका गुगल डॉक्युमेंटने शेअर केली होती. परंतु नंतर तिनेच ते ट्वीटच डिलीट केले. त्या डॉक्युमेंटसमध्ये शेतकरी आंदोलनाबाबत चिथावणीखोर माहिती होती, असा आरोप केला जात आहे. आता दिल्ली पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून ग्रेटावर गुन्हा दाखल न करता तिने शेअर केलेल्या डॉक्युमेंटच्या लेखकावर गुन्हा दाखल केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!