मुंबई : ‘वीरप्पन गँगचा पर्दाफाश करण्याबाबत मी एक ट्विट केलं होतं ते शिवसेना नेत्यांना झोंबले होते. मी आज पुरावे घेवून आलोय की विरप्पन गँग कशी खंडणी वसूल करते, ‘ असं सांगत भर पत्रकार परिषदेत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेकडून फेरीवाल्यांना देण्यात आलेल्या पावत्या मांडल्या.
संदीप देशपांडे यांनी शिवसेनेचा वीरप्पन टोळी असा उल्लेख केला आहे. यावर बोलताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेची खिल्ली उडवली आहे. आदित्य ठाकरेंनी मनसेचा टाईमपास टोळी म्हणून उल्लेख केला. “ती संघटना आहे की पक्ष आहे मला कळत नाही. त्यांचे कार्यकर्तेही त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. मग आपण का द्यावं? ही तर टाईमपास टोळी आहे”, असं विधान आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.
मनसेला टाईमपास टोळी असं संबोधल्यानंतर मनसेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी ट्विटरमार्फत शिवसेनेला चोख उत्तर दिलं आहे. ‘ “औरंगाबादचं नामांतर ‘संभाजीनगर’ करू” यात शिवसेनेने ३० वर्षं घालवली… याला म्हणतात, टाइमपास!’ असं पहिलं ट्विट त्यांनी केलं आहे. यानंतर, ‘ “मुंबईकरांना चांगले रस्ते, बगीचे, शाळा देऊ” असं आश्वासन शिवसेना प्रत्येक महापालिका निवडणुकीत देते… याला म्हणतात, टाइमपास!’
https://twitter.com/KirtikumrShinde/status/1357275624461672449?s=20
https://twitter.com/KirtikumrShinde/status/1357275830481690626?s=20
‘किंबहुना, करोना संकटकाळात लोकांना प्रत्यक्ष मदत करायचं सोडून मुख्यमंत्री उठता- बसता फेसबुक लाईव्ह करत होते… याला म्हणतात, टाइमपास!’ असे ट्विट करून त्यांनी आदित्य ठाकरे यांना चांगलंच सुनावलं आहे.
https://twitter.com/KirtikumrShinde/status/1357276085486899204?s=20
महत्वाच्या बातम्या
- शेतकरी आक्रमक होऊन परिस्थिती चिघळल्यास भाजप सरकारच जबाबदार असेल – शरद पवार
- काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत दबाव असल्यानं अध्यक्ष बदलणार; पवारांचा ऑफ द रेकॉर्ड गौप्यस्फोट
- ‘मनसेचे आंदोलन म्हणजे नौटंकी’, चंद्रकांत खैरेंची टीका
- ‘अजित पवार यांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ आली’
- ट्रॅक्टर रॅलीत दगावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी प्रियंका गांधी रवाना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

