मुंबई : काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलला वेग आला आहे. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा सोपवला आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे पटोले यांनी राजीनामा सोपवल्यानंतर आता झिरवळ यांच्याकडेच हंगामी अध्यक्षपद असणार आहे.
पुढील प्रदेशाध्यक्ष हे अधिक आक्रमक असावेत यासाठी काँग्रेसच्या कमिटीचा आग्रह असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याच्या चर्चा सुरु आहेत. दरम्यान, काँग्रेसला आता उपमुख्यमंत्री पदाबाबत रस असल्याचे वृत्त विविध माध्यमांनी दिले आहे. यामुळे आजच्या दिवसभरात राजकीय हालचालींना वेग आल्याचे देखील दिसून आलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वृत्तांचे खंडन केलं आहे. तर दुसरीकडं, काँग्रेसच्या या भूमिकेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील नाराज असल्याचं सूत्रांकडून समजत आहे. ‘महाविकास आघाडीचे सरकार स्थिर होत असताना राजीनाम्याची गरज नव्हती,’ अशी भूमिका उद्धव ठाकरे यांची असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे.
नाना पटोलेंच्या राजीनाम्यावर शरद पवार यांची भूमिका –
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनौपचारिक प्रतिक्रिया दिली आहे. ‘काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत दबाव असल्यानं अध्यक्ष बदलाचा निर्णय घेतला गेला,’ असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. इतकंच नाही तर नाना पटोलेंनी राजीनामा दिल्यामुळे पुढील अध्यक्षपदाची जागा ही तिन्ही पक्षांसाठी खुली झाल्याचं ते म्हणाले आहेत.
‘आता नवीन विधानसभा अध्यक्ष ठरवण्यासाठी पुन्हा तिन्ही पक्षांमध्ये चर्चा होणार. अध्यक्षपद काँग्रेसकडे होतं ते आता खुलं झाले आहे.’ असं वक्तव्य शरद पवार यांनी केल्यामुळे आता अध्यक्षपद काँग्रेसकडून निसटणार का ? असा प्रश्न निर्माण होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- मनसेला टाईमपास म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना मनसे नेत्याचं चोख प्रत्युत्तर !
- सुनावणी पुढे ढकलल्याने खडसेंवरील ईडीची पीडा तूर्तास टळली !
- …तर तिसरा उपमुख्यमंत्री अपक्षांचा करा – बच्चू कडू
- ‘अजित पवार यांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ आली’
- ट्रॅक्टर रॅलीत दगावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी प्रियंका गांधी रवाना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
