रत्नागिरी : काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलला वेग आला आहे. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा सोपवला आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे पटोले यांनी राजीनामा सोपवल्यानंतर आता झिरवळ यांच्याकडेच हंगामी अध्यक्षपद असणार आहे.
पुढील प्रदेशाध्यक्ष हे अधिक आक्रमक असावेत यासाठी काँग्रेसच्या कमिटीचा आग्रह असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याच्या चर्चा सुरु आहेत. दरम्यान, काँग्रेसला आता उपमुख्यमंत्री पदाबाबत रस असल्याचे वृत्त विविध माध्यमांनी दिले आहे. यामुळे आजच्या दिवसभरात राजकीय हालचालींना वेग आल्याचे देखील दिसून आलं आहे.
त्यामुळे महाविकास आघाडी एकत्रितपणे याला सहमती देणार का ? हे देखील महत्वाचं ठरणार आहे. तसं झाल्यास राज्यात दोन उपमुख्यमंत्री पदाच्या जागा निर्माण होतील. सद्या कर्नाटक राज्यात दोन उपमुख्यमंत्रीपद आहेत. दरम्यान, काँग्रेसच्या उपमुख्यमंत्रीपदा बाबतच्या आग्रहाबाबत भाजप नेते निलेश राणे यांनी भाष्य करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
‘अजित पवारांना कधी मुख्यमंत्री होता आले नाही व ते कधी होणार नाहीत पण कसंतरी उपमुख्यमंत्रीपद मिळालं होतं पण आता २ उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणार अशी चर्चा आहे म्हणजे अजित पवार यांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ आली. काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळालच पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे.’ असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.
अजित पवारांना कधी मुख्यमंत्री होता आले नाही व ते कधी होणार नाहीत पण कसंतरी उपमुख्यमंत्रीपद मिळालं होतं पण आता २ उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणार अशी चर्चा आहे म्हणजे अजित पवार यांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ आली. काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळालच पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) February 4, 2021
महत्वाच्या बातम्या
- ‘ही तर बाळासाहेबांची इच्छा’, मनसेचे स्पष्टीकरण
- काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत दबाव असल्यानं अध्यक्ष बदलणार; पवारांचा ऑफ द रेकॉर्ड गौप्यस्फोट
- आम्ही त्यांच्या धमकीला घाबरत नाही; अजित पवारांचे शिवेंद्रराजेंना जोरदार प्रत्युत्तर
- महाराष्ट्रात कॉंग्रेसला बळकट करण्यासाठी मोठ्याप्रमाणावर संघटनात्मक बदल करावे लागणार
- ट्रॅक्टर रॅलीत दगावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी प्रियंका गांधी रवाना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

