Share

…तर तिसरा उपमुख्यमंत्री अपक्षांचा करा – बच्चू कडू

Published On: 

अहमदनगर : काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलला वेग आला आहे. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा सोपवला आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे पटोले यांनी राजीनामा सोपवल्यानंतर आता झिरवळ यांच्याकडेच हंगामी अध्यक्षपद असणार आहे.

पुढील प्रदेशाध्यक्ष हे अधिक आक्रमक असावेत यासाठी काँग्रेसच्या कमिटीचा आग्रह असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याच्या चर्चा सुरु आहेत. दरम्यान, काँग्रेसला आता उपमुख्यमंत्री पदाबाबत रस असल्याचे वृत्त विविध माध्यमांनी दिले आहे. यामुळे आजच्या दिवसभरात राजकीय हालचालींना वेग आल्याचे देखील दिसून आलं आहे.

त्यामुळे महाविकास आघाडी एकत्रितपणे याला सहमती देणार का ? हे देखील महत्वाचं ठरणार आहे. तसं झाल्यास राज्यात दोन उपमुख्यमंत्री पदाच्या जागा निर्माण होतील. यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भाष्य केलं आहे. बच्चू कडू महाविकास आघाडी सरकारमधील सत्तेत सहभागी आहेत. ‘दोन उपमुख्यमंत्री होणार नाही. जर असे झाले तर तिसरा उपमुख्यमंत्री अपक्षांना दिला पाहिजे’ अशी मागणी वजा टोला त्यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!