सांगली : महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सत्ताधारी व राज्यपाल यांच्यात वाद सुरु झालेला आहे. कोरोना काळात मंदिरे उघडण्यावरून सत्ताधारी व विरोधक यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. या वादात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही उडी घेतली होती. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित पुरोगामी झाला आहात का असा सवाल केला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती.
आझाद मैदानातील शेतकरी आंदोलनावरून राज्यपालांवर टीकेची झोड उठवली गेली असतानाच राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार टीका आहे. ‘सांगली जिल्ह्यात कृषी महाविद्यालय व्हावं अशी मागणी आहे. मात्र, राज्याच्या राज्यपालपदी एक विक्षिप्त माणूस बसला आहे, असं म्हणत यशोमती ठाकूर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकास्त्र डागले आहे.
‘तुम्ही आम्ही संविधानाने एकत्र जोडलो आहोत म्हणून एकत्र आलोय. त्याच संविधानावर प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारणारा व्यक्ती आज महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून बसलाय. ते अडथळे आणत आहेत, म्हणून सांगलीत कृषी महाविद्यालय होत नाहीये’, राज्यपालांबाबत असे आक्षेपार्ह वक्तव्य यशोमती ठाकूर यांनी केल आहे.
महत्वाच्या बातम्या
- मनसेला टाईमपास म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना मनसे नेत्याचं चोख प्रत्युत्तर !
- सुनावणी पुढे ढकलल्याने खडसेंवरील ईडीची पीडा तूर्तास टळली !
- ‘मनसेचे आंदोलन म्हणजे नौटंकी’, चंद्रकांत खैरेंची टीका
- ‘अजित पवार यांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ आली’
- ट्रॅक्टर रॅलीत दगावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी प्रियंका गांधी रवाना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
