Share

शेतकऱ्यांना दहशतवादी ठरवणारे तुम्ही कोण?; रुपाली चाकणकर यांचा कंगणावर निशाणा

Published On: 

पुणे:- कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता ७० दिवस उलटून गेलेत. केंद्रातील मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात २६ नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेत. या शेतकऱ्यांत विशेषत: पंजाब आणि हरीयाणातल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. असं असलं तरी देशभरातील विविध शेतकरी संघटना आणि श्रमिक संघटनांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे.

दरम्यान, पॉपस्टार रिहाना हिने दिल्लीतील शेतकरी आंदोलनाकडे जगाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केल्यानंतर कंगना तिच्यावर नेहमीच्या आविर्भावात तुटून पडली होती. ते शेतकरी नव्हेत तर दहशतवादी आहेत. तू शांत बस, मूर्ख. आम्ही तुझ्यासारखे मूर्ख नाही आहोत जो आमचा देश विकू, असे कंगनाने म्हटले होते.

कंगनाच्या या टीकेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेत त्यांनी कंगणावर निशाणा साधला आहे. ‘रिहानाचं ट्विट येताच भाजपच्या काही चमच्यांच्या प्रचंड पोटात दुखतंय. कंगणाने याबाबत ट्विट करत हे शेतकरी दहशतवादी आहे, असं म्हटलंय. मला या अशा लोकांना विचारायचं आहे. शेतकऱ्यांना दहशतवादी ठरवणारे तुम्ही कोण? तुमच्याकडे याचे पुरावे आहेत काय? पुरावे असतील तर ते सादर करा. किमान आपण ज्या देशात राहतो, ज्या देशाचं अन्न खातो, ते अन्न या अन्नदात्याने पिकवलं आहे. या शेतकऱ्याने पिकवलं आहे. याचं भान ठेवलं तर आपल्याला स्वतःला आपली लाज वाटेल’, अशा शब्दात चाकणकर यांनी टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!