🕒 1 min read
नवी दिल्ली:- कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता ७० दिवस उलटून गेलेत. केंद्रातील मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात २६ नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेत. या शेतकऱ्यांत विशेषत: पंजाब आणि हरीयाणातल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. असं असलं तरी देशभरातील विविध शेतकरी संघटना आणि श्रमिक संघटनांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे.
दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे गाझीपूरला जाऊन आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. शिवसेना नेते संजय राऊतांच्या नेतृत्वाखाली सेनेच्या शिष्टमंडळाने गाझीपूरला जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतल्यानंतर आता सुप्रिया सुळेही आज गाझीपूर सीमेवर जाऊन शेतकऱ्यांना भेटून त्यांना आपला पाठिंबा देतील.
मी शेतकऱ्याची लेक आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांबरोबर ज्या प्रकारे वागतंय ते पाहून दु:ख होतंय. मराठीमध्ये एक म्हण आहे अन्नदाता सुखी भव: परंतु आज अन्नदाताच आंदोलन करतोय. मी केंद्र सरकारला एक विनंती करते की त्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांशी चर्चा करुन त्यांना न्याय द्यावा, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. त्या ‘एएनआयशी’ बोलत होत्या.
महत्वाच्या बातम्या
- शेतकरी आंदोलनावर लता मंगेशकर यांचीही प्रतिक्रिया, म्हणाल्या…
- ‘ट्वीट करण्याआधी दिल्लीत जाऊन शेतकऱ्यांची परीस्थिती बघा’ संजय राऊतांचा सेलिब्रिटींना टोला
- “माझे काम हे मागे राहून विराटला मदत करणे हे आहे”, रहाणेचे मोठे भाष्य
- शेतकरी आंदोलनावर सचिन-विराट, रोहितनंतर अनेक क्रिकेटपटूंची प्रतिक्रिया, म्हणाले…
- ‘शाब्बास देवेंद्रजी! आपण सरकारची ‘मन की बात’च जाहीर केली !’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
