Share

हॉटेलचालकावर मद्दधुंद युवकांचा गोळीबार; हॉटेलमालक गंभीर जखमी

Published On: 

उस्मानाबाद : बुधवारी (दि. ३) दुपारी १२.३० ते १ वाजेच्या सुमारास उस्मानाबाद तालुक्यातील भंडारी गावालगत नागपूर-रत्नागिरी राज्य महामार्गावर हॉटेलमध्ये काही तरूण दारू पिऊन धिंगाणा घालत होते. तेव्हा हॉटेलचालकाने गोंधळ घालु नका म्हणून प्रतिबंध करताच सहा लोकांनी गोळीबार केला. यामध्ये हॉटेलचालक गंभीर जखमी झाले आहेत.

नागपूर-रत्नागिरी या राज्य महामार्गावर उस्मानाबाद तालुक्यात तुळजापूरपासून २२ किलोमीटर अंतरावर भंडारी गावालगत बाळासाहेब दामोदर मोरे यांचे रिलॅक्स नावाचे हॉटेल आहे. हॉटेलवर स्विफ्ट कारमधून आलेल्या सहा अज्ञात लोकांनी जेवणासाठी ऑर्डर दिली. त्यानंतर त्यांनी दारू पिऊन गोंधळ घालण्यास सुरुवात केली. हॉटेल मालक बाळासाहेब मोरे यांनी त्यांना ‘गोंधळ करू नका, माझ्याकडे फॅमिली गिऱ्हाईक आहेत, शांत बसा,’ अशी विनंती केली असता धिंगाणा घालणाऱ्या अज्ञात सहा लोकांनी त्यांच्याशी वाद घातला आणि मारहाण केली. त्यातील एकाने पिस्तुलातून मोरे यांच्यावर गोळीबार केला.

या गोळीबारात मोरे यांना उजव्या दंडावर व छातीवर गोळी लागल्याने मोरे जखमी झाले. त्यांना पुणे येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. हॉटेल परिसरात गोंधळ उडताच हॉटेलमधील कामगार व भंडारी गावातील नागरिकांनी हॉटेलकडे धाव घेतली. सहापैकी पाच जणांनी जीपसह पोबारा केला, तर अन्य एकास कामगारांनी पकडून चोप दिला. सदरील व्यक्ती गंभीर जखमी झाल्याने पोलिसांनी त्याला उपचारासाठी उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!