हिंगोली : शहरातील नागरिकांकडून थकबाकी वसुलीसाठी पालिकेने एक नवा उपक्रम हाती घेतला आहे. शहरातील सार्वजनिक चौकात पालिकेने थकबाकीदारांची नावाची यादीचे बॅनर बनवुन लावले. या बॅनर मुळे थकबाकीदारांची नावे जाहीर होऊ लागली आहे. या यादीत ८० नागरिकांच्या नावाचा समावेश आहे. सध्याच्या स्थितीत शहरातील २० हजार नागरिकांकडे घरपट्टीच्या ३ कोटी ५० लाखांची थकबाकी आहे.
हिंगोली शहरात घरपट्टीची थकबाकी वाढलेली आहे. त्यासाठी पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी शहरातील नागरिकांना घरपट्टी भरण्याचे आवाहन केले होते. याशिवाय शहरातील सर्व प्रभागांमधून कचरा गोळा करण्यासाठी जाणाऱ्या घंटागाड्यांच्या माध्यमातूनही नागरिकांना घरपट्टी भरण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही नागरिकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.
यावेळी बोलताना पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी सांगीतले की, नागरिकांना आवश्यक नागरी सुविधा देण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र पालिकेला घरपट्टी व पाणीपट्टीच्या कराचा भरणा करून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम नागरिकांचे आहे. कर भरण्यासाठी वारंवार सूचना देऊनही नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने बॅनर लावण्यात आले आहे. थकबाकीदारांची यादी असणारे बॅनर शहरातील मुख्य चौक असलेल्या महात्मा गांधी चौकात लावले आहे. हे बॅनर पाहण्यासाठी नागरिकांचीही मोठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे.
महत्वाच्या बातम्या
- शेतकरी आंदोलनावर लता मंगेशकर यांचीही प्रतिक्रिया, म्हणाल्या…
- ‘ट्वीट करण्याआधी दिल्लीत जाऊन शेतकऱ्यांची परीस्थिती बघा’ संजय राऊतांचा सेलिब्रिटींना टोला
- “माझे काम हे मागे राहून विराटला मदत करणे हे आहे”, रहाणेचे मोठे भाष्य
- शेतकरी आंदोलनावर सचिन-विराट, रोहितनंतर अनेक क्रिकेटपटूंची प्रतिक्रिया, म्हणाले…
- ‘शाब्बास देवेंद्रजी! आपण सरकारची ‘मन की बात’च जाहीर केली !’


