🕒 1 min read
मुंबई : शेतकरी विधेयकाविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन जवळपास 70 दिवसांपासून सुरू आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ परदेशी सेलिब्रिटीही पुढे आले आहेत. पॉप सिंगर रिहानाने समर्थनार्थ ट्वीट केल्यानंतर पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग, पूर्वाश्रमीची पॉर्न स्टार मिया खलिफानेही या आंदोलनाला पाठिंबा दिला.
हा विषय जागतिक सेलिब्रिटींनी उपस्थित केल्यानंतर आता देशातही एक आवाज उठविला जात आहे की, हा प्रश्न पूर्णपणे भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. यामुळे यावर बोलण्याचा अधिकार फक्त भारतीय लोकांनाच मिळाला पाहिजे. क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरनेही याबाबत सरकारला पाठिंबा दिला आहे. सचिन तेंडुलकरच्या ट्वीटनंतर भारतातील अनेक क्रिकेटपटूंनी यावर ट्वीट केले आहे. आता गाणकोकिळा आणि भारतरत्न लता मंगेशकर यांनी देखील शेतकरी आंदोलनावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनीही सरकारच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.
यासंदर्भात, सर्वप्रथम अभिनेता अक्षय कुमारने ट्विट करुन मत मांडलं. त्यानंतर, मास्टरब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरने आपले मत मांडले. त्यानंतर, गाणगोकिळा लता मंगेशकर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी ट्विटरवरुन सरकारच्या बाजुने आपलं मत मांडायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवालने अक्षय कुमारचेच सेम ट्विट केलंय.
भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने केलेल्या ट्विटमधील फोटो अक्षय कुमारने आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर केला आहे. तसेच, शेतकरी हा देशाचा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्या प्रश्नांना सोडविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत, ते दिसूनही येतंय. चला सौहार्दपूर्णपणे या समस्येचं समाधान काढूयात, ना की देशाला तोडणाऱ्या गोष्टींकडे लक्ष द्यायंचं. #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda…’ असे ट्विट अक्षय कुमारने केले आहे.
Farmers constitute an extremely important part of our country. And the efforts being undertaken to resolve their issues are evident. Let’s support an amicable resolution, rather than paying attention to anyone creating differences. ????????#IndiaTogether #IndiaAgainstPropaganda https://t.co/LgAn6tIwWp
— Akshay Kumar (@akshaykumar) February 3, 2021
अक्षयच्या ट्विटची कॉपीच भारताची फुलराणी बॅडमिंटनपटू सायना नेहवालने केल्याचे दिसून येते. कारण, सायनाने केलेले ट्विट व अक्षयच्या ट्विटमधील शब्द न शब्द सेमच आहेत. अक्षयने बुधवारी दुपारी 2.07 वाजता ट्विट केले असून सायनाने त्याच दिवशी रात्री 10.26 वाजता ट्विट केलंय. त्यामुळे, इंडिया टुगेदरच्या म्हणणाऱ्या सेलिब्रिटींचं ट्विट टुगेदर झाल्याचं दिसून येत आहे.
Farmers constitute an extremely important part of our country. And the efforts being undertaken to resolve their issues are evident. Let’s support an amicable resolution, rather than paying attention to anyone creating differences. ????????#IndiaTogether #IndiaAgainstPropaganda pic.twitter.com/FhclAMLiik
— Saina Nehwal (@NSaina) February 3, 2021
महत्वाच्या बातम्या
- शेतकरी आंदोलनावर लता मंगेशकर यांचीही प्रतिक्रिया, म्हणाल्या…
- ‘ट्वीट करण्याआधी दिल्लीत जाऊन शेतकऱ्यांची परीस्थिती बघा’ संजय राऊतांचा सेलिब्रिटींना टोला
- “माझे काम हे मागे राहून विराटला मदत करणे हे आहे”, रहाणेचे मोठे भाष्य
- शेतकरी आंदोलनावर सचिन-विराट, रोहितनंतर अनेक क्रिकेटपटूंची प्रतिक्रिया, म्हणाले…
- सार्वजनिक चौकात झळकली थकबाकीदारांची नावे; हिंगोली पालिकेचा नवा फंडा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
