Share

विवेक अग्निहोत्रींचा नमाज अदा करताना फोटो व्हायरल, नेटकरी म्हणाले…

Published On: 

मुंबई : द काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांच्याबाबत सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.  विवेक अग्निहोत्री यांचा एक फोटो सध्या वाऱ्यासारखा व्हायरल होतोय.  हा फोटो विवेक यांनीच त्यांच्या ट्विटर अकाउंटवर दहा वर्षांपूर्वी शेअर केला होता. त्यांचा हा  फोटो शेअर करत अनेकांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांनी विवेक अग्निहोत्री दुहेरी भूमिका घेत असल्याचं म्हटलंय. विवेक यांचा ‘द काश्मीर फाईल्स‘ हा सिनेमा काश्मीरी पंडितांवर झालेल्या अत्याचारांवर आधारित आहे. विवेक हे  हिंदुत्ववादी विचारसरणीचे असल्याचंही बोललं जातं. अश्यात विवेक यांचा हा डोक्यात गोल टोपी आणि दुआ मागण्यासाठी पुढे आलेले हात हा फोटो अगदी विरूद्ध आहे. त्यामुळे विवेक यांच्यावर टीका होताना दिसत आहे.

विवेक यांनी 25 नोव्हेंबर 2012 ला म्हणजेच 10 वर्षांपूर्वी त्यांच्या ट्विटरवर एक फोटो शेअर केला होता. यात त्यांच्या डोक्यात मुस्लिम लोक नमाजसाठी परिधान करतात ती गोल टोपी दिसत आहे. तसंच जामा मस्जिदही दिसतेय. विवेक यांनी या फोटोला “At Jama masjid. #Freedom”, असं कॅप्शन दिलं होतं. आता हाच फोटो शेअर करत अनेकजण आपली प्रतिक्रिया देत आहेत .

नेटकऱ्यांची प्रतिक्रिया
10 वर्ष जुना फोटो रिट्विट करत अनेकांनी विवेक अग्निहोत्री यांना कात्रीत पकडलं आहे. एका नेटकऱ्याने “प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात”, असं म्हटलंय.

एका नेटकऱ्याने म्हटलंय की “विवेक अग्निहोत्री 2014 पूर्वी मुस्लिम होते. 2014 नंतर त्यांनी धर्मपरिवर्तन केलं.”

आणखी एक नेटकरी म्हणतो, “अप्रतिम लॉजिक आहे विवेकजी, एकीकडे पंडितांच्या हत्याकांडावर चित्रपट काढला. दुसरीकडे अशी टोपी घालून काय संदेश द्यायचा आहे.”
विवेक अग्निहोत्री यांचा आगामी चित्रपट गुजरात फाईल्स असावा”, असं म्हणत एका नेटकऱ्याने त्यांना टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!