Share

होळी साजरी करताना डीजे-डॉल्बी लावण्यास बंदी; राज्य सरकारची नियमावल्ली जारी..

Published On: 

मुंबई : कोरोनाचे संकट आता आवाक्यात येत आता असून बऱ्यापैकी सगळे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तरीही कोरोनाच्या प्रतिबंधासाठी आवश्यक असलेले नियम पाळणं गरजेचंच आहे. मास्कचा वापर, देहदूरी आणि हात धुणे या कृती सतत करणे गरजेचं आहे. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यामुळे सण-उत्सव साजरे करण्याला तशी अडचण उरली नाहीये. त्यामुळे नेहमीच्याच उत्साहाने मात्र आवश्यक ती खबरदारी घेत समारंभांना सरकारने परवानगी दिली आहे. येत्या १७ तारखेला होळीचा सण महाराष्ट्रात साजरा केला जाणार आहे. मात्र, या होळी आणि धूलवड सणाच्या निमित्ताने गृहखात्याने नवी नियमावली जारी केली आहे.

पोलिसांनी जारी केलेली नियमावली पुढीलप्रमाणे –

-रात्री दहाच्या आत  होळी खेळावी  त्यानंतर परवानगी नाही.

-होळी साजरी करताना डीजे-डॉल्बी लावण्यास बंदी डीजे लावल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल,

-होळी साजरी करताना मद्यपान आणि बिभत्स वर्तन केल्यास कारवाई

-महिलांची आणि मुलींची खबरदारी घेणे आवश्यक

-दहावी आणि बारावीच्या परीक्षा असल्याने लाऊड स्पीकर जोरात लावू नयेत,

-कोणत्याही जाती-धर्माच्या भावना दुखावतील अशा घोषणा देऊ नये,

-धूलवडीच्या दिवशी जबरदस्ती रंग आणि पाण्याचे फुगे फेकू नये.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!