🕒 1 min read
मुंबई: भारताचा डावखुरा सलामीवीर शिखर धवन आयपीएलमध्ये पंजाब किंग्जसोबत पहिल्यांदा खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. ऑक्शनमध्ये पंजाबने शिखर धवनला ८. २५ कोटी रुपयांना सामील करून घेतले होते. आयपीएल २०२२ मध्ये, पंजाब किंग्ज फ्रँचायझी पूर्णपणे नवीन शैलीत दिसू शकते. दरम्यानच्या काळात संघाच्या सलामीच्या जोडीबाबत साशंकता कायम आहे. यावरअलीकडेच शिखर धवनने पंजाब किंग्जमध्ये त्याचा सलामीचा जोडीदार कोण असेल सांगितले.
शिखर धवनने (Shikhar dhawan) फाऊंडेशन लॉन्चिंगच्या वेळी सांगितले, “मयंक आता खूप अनुभवी खेळाडू बनला आहे. तो एक उत्तम पात्र तसेच एक मजेदार व्यक्ती आहे, त्यामुळे मला त्याच्यासोबत पंजाब किंग्जसाठी डावाची सुरुवात करायला आवडेल. आमच्याकडे युवा आणि अनुभव यांचा चांगला मिलाप आहे, ज्यामुळे आमचा संघ खूप मजबूत आहे आणि आम्ही आगामी आयपीएल हंगामात चांगली कामगिरी करू.”
शिखर धवन आयपीएल २०२२ मध्ये मयंक अग्रवालच्या (mayank agarawal) नेतृत्वाखाली खेळणार आहे, अनुभवाच्या आधारे शिखर धवन पंजाब किंग्जचा कर्णधार म्हणून दिसू शकतो अशी अटकळ बांधली जात होती. पण, फ्रँचायझीने त्यांच्या रिटेन खेळाडूंवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला होता. २६ मार्चपासून आयपीएल सुरू होत आहे, पंजाब किंग्ज या हंगामातील पहिला सामना २७ मार्च रोजी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध खेळेल.
महत्वाच्या बातम्या
- “२०२४ ला महाराष्ट्रात पूर्ण बहुमताचं…”, देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
- होळी साजरी करताना डीजे-डॉल्बी लावण्यास बंदी; राज्य सरकारची नियमावल्ली जारी..
- पिक विमा कंपन्याबाबद अजित पवार घेणार “हा” मोठा निर्णय!
- “३२ वर्षांआधी कुठे होते हे लोक?”- काश्मीर फाईल्सवरून संजय राऊतांचा भाजपला सवाल
- IPL 2022: २००८ नंतर पहिल्यांदाच ‘हे’ तीन खेळाडू नसणार आयपीएलचा भाग
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
