मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आता संपूर्ण ठाकरे कुटुंबियांना निशाण्यावर धरले आहे.उद्धव ठाकरे परिवार म्हणजे आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, रश्मी ठाकरे यांनी कोमो स्टॉक्स अँड प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नंदकिशोर चतुर्वेदी आणि ल्यूक बेनेडिक्ट यांना २०१९ मधे विकली.ल्यूक बेनेडिक्ट हा ऑस्ट्रेलियन आहे. याचा आणि ठाकरे कुटुंबियांचा काय संबंध आहे? असा सवाल सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ट्वीट करत केला आहे.
तसेच ठाकरे परिवाराने महापालिकेतील घोटाळ्याचे पैसे आणि महा वसुलीचे पैसे पांढरे करण्यासाठी नंदकिशोर चतुर्वेदीचा मोठ्या प्रमाणात वापर केला.
कोमो स्टॉप प्रॉपर्टीज लिमिटेड या कंपनीत रश्मी ठाकरे,आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे हे अधिकृत पार्टनर आहे. यांनी आदित्य कुलियन यांच्याकडून तीन कोटी कर्ज घेतलं असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे. तसेच ही कंपनीदेखील नंदकिशोर चतुर्वेदीची आहे. नंदकिशोर चतुर्वेदी यांचा यातील परतणार हाच ल्यूक बेनेडिक्ट आहे.
ल्यूक बेनेडिक्टकडून कर्ज घेऊन ठाकरे सरकारने कोमो स्टॉक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी २०१४ मध्ये बनवली. आणि २०१९ मध्ये कंपनी पुन्हा नंदकिशोर चतुर्वेदी आणि ल्यूक बेनेडिक्टला विकली. बेनेडिक्ट ऑस्ट्रेलियन आहे म्हणून मला प्रश्न आहे की, यात मनी लॉड्रिंगमध्ये फेराफेरी किंवा याचं वायर रेशन झालेलं तर नाही ना? असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.
सोबतच हा काळा पैसा आला कुठून? वसुलीचा आहे पालिकेचा आहे?की यशवंत जाधवांचा कॉन्ट्रॅक्टर विमल अगरवालचा? की नालेसफाई कॉन्ट्रॅक्टरचा? असा सवालही किरीट सोमय्यांनी विचारला आहे. इन्कम टॅक्स विभाग, ईडी, कंपनी मंत्रालय सगळ्या ठिकाणी या संबंधात तक्रार दाखल केली असल्याचंही सोमय्या यांनी म्हटले आहे. तसेच अनिल परब यांचा जो भ्रष्ट पैशांनी रिसॉर्ट पाडण्याचा आदेश निघाल्यानंतरही उद्धव ठाकरे ते पाडत नाहीत, तो पाडायला आम्ही उद्या सकाळी आम्ही दापोलीला जाणार आहे.अशी माहिती सोमय्या यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
आमदारांच्या मोफत घरांसंदर्भात जितेंद्र आव्हाडांनी केला खुलासा; म्हणाले…
Women’s World Cup : अनस्टॉपेबल ऑस्ट्रेलिया..! स्पर्धेत नोंदवला सलग सातवा विजय
काय सांगता! अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि रोहन श्रेष्ठचे ब्रेकअप! चार वर्षांचं नात संपलं
“आमदार पळून जातील या भीतीनेच…”, चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला जोरदार टोला
“आमचेच कच्चे दुवे, कच्चे मडके! हे दुर्दैवाने खरे” – राजू शेट्टींची खंत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

