Share

“…वरून शक्ती कायद्याची अंमलबजावणी कितपत होईल याची शंका”, चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारवर निशाणा

Published On: 

मुंबई: शक्ती विधेयकाला अधिक बळकटी देण्यासाठी काल (२४ मार्च) गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सन २०२० चे विधेयक क्र. ५२ “महाराष्ट्र अनन्य विशेष न्यायालये (शक्ती कायद्याखालील महिलांच्या व बालकांच्या विरुद्धच्या विवक्षित अपराधांसाठी) विधेयक २०२०” मांडले. या विधेयकाला एकमताने मंजुरी देण्यात आली आहे. मात्र यावरच भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी मात्र ठाकरे सरकारवर शंका व्यक्त केली आहे.

“महिलांना अत्याचारा विरोधात न्याय मिळण्यासाठी अनेक अभिनंदनीय तरतुदी असलेले शक्ती विधेयक विधिमंडळाने एकमताने संमत केले आहे. त्याबद्दल ठाकरे सरकारला धन्यवाद. मात्र राज्यसरकार ज्याप्रकारे मंत्र्यांपासून पदाधिकाऱ्यांपर्यंत बलात्काऱ्यांना पाठीशी घालतयं त्यावरून या शक्ती कायद्याची अंमलबजावणी कितपत होईल अशी शंका वाटते.”, असे ट्वीट चित्रा वाघ यांनी केले आहे.

दरम्यान महिला व बालकांवरील अत्याचाराच्या संदर्भात गुन्हेगारांना योग्य शिक्षा करणे अत्यंत आवश्यक असल्याने विशेष सरकारी अभिवक्ता बदलण्याची व त्याऐवजी विशेष सरकारी अभिवक्ता नेमण्याची खंड ७ मध्ये तरतूद करण्यात आली आहे. खंड ८ मध्ये विनिर्दिष्ट अपराधांचे अन्वेषण करण्यासाठी राज्य शासनाकडून विशेष पोलिस पथक गठीत करण्याची तरतूद करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक, पोलिस अधिकारी यांना अपराधाचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर अपराधाचे अन्वेषण विशेष पथकाकडे सोपविण्याचे अधिकार असतील,असे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या:

दिशा सालियनची हत्याच! लवकरच CBI कडे पेनड्राईव्ह देणार; नितेश राणेंचा इशारा

मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ निर्णयावर संजय राऊतांची असहमती; म्हणाले…

“यापुढे आघाडीत सहभागी व्हायचं की नाही, हा निर्णय…” – राजू शेट्टी

…त्यापेक्षा सर्वसामान्यांना २०० युनिट मोफत वीज द्या- राजू पाटील

VIDEO : “चांगलं वाटतंय, पण…”; CSKचा कॅप्टन झाल्यानंतर जडेजा पहिल्यांदा काय म्हणाला पाहा!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!