मुंबई : भारतीय जनता पक्ष आणि विरोधी पक्ष दोन्हीकडच्या बाजूने राजकारण होत असताना सर्वांनीच सभ्य भाषेचा वापर करण्याचा सल्ला आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला.
क्रियेला प्रतिक्रिया सध्या दोन्ही बाजूकडून उमटत आहेत, मात्र सार्वजनिक जीवनात वावरताना आपण सभ्य भाषेचाच वापर करायचा सल्ला आज जयंत पाटील यांनी दिला आहे. राजकारण हे होतच राहणार आहे मात्र सार्वजनिक मर्यादांचे उल्लंघन आपण करू नये. अशा शब्दात आज जयंत पाटील यांनी राज्यात सध्या सुरु असलेल्या सूड नाट्यावर मार्मिक प्रतिक्रिया दिली . जयंत पाटील म्हणाले कि, ‘ महाराष्ट्र नेहमीच सर्वांचं आदर करणार आणि सर्वांनाच एकत्र घेऊन पुढे जाणार राज्य आहे ; त्यामुळे सर्वांनी टोकाची भाषा बोलणे टाळले पाहिजे. सार्वजनिक आयुष्यात काम करायचं म्हंटल कि राजकारण हे होतच राहणार आहे, मात्र आपण नेहमीच मर्यादा पाळल्या पाहिजेत.
२०१४ मध्ये केंद्रात नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून सुडाचं राजकारण खूप मोठ्या प्रमाणात वाढले असल्याची टीका पण यावेळीज जयंत पाटील यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- लोकल प्रवासाबाबत उच्च न्यायालयाची टिप्पणी ; म्हणाले
- मिसळ खातानाचे फोटो टाकत रोहित पवार यांचा देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून टोला
- मराठी भाषा दिनावरुन विनोद तावडेंचा शिवसेनेला टोला; म्हणाले…
- ‘‘लडकी हूं, लड सकती हूं’ हा नारा आता परिवर्तन घडवल्याशिवाय राहणार नाही’; यशोमती ठाकूर यांचा विश्वास
- ‘जय भवानी ही घोषणा सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली’ – अॅड. प्रकाश आंबेडकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
