Share

मिसळ खातानाचे फोटो टाकत रोहित पवार यांचा देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून टोला

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आज जोरदार टोलेबाजी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी जळगाव मतदारसंघात  मिसळ खातानाचे फोटो ट्वीट करत जोरदार टोलेबाजी केली. त्यांनी मिसळ खातानाचा फोटो ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून टोलेबाजी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एका मराठी मालिकेत माझे पती देवेंद्र फडणवीस हे एका बैठकीत ३०-३५ पुरणपोळ्या सहज पातेलंभर तूपासोबत खायचे असे म्हटले होते. यावरूनच आज कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. त्यांनी मिसळ खात असतानाचा फोटो ट्विट करत जोरदार टोलेबाजी केली आहे. ट्विट करत रोहित पवार म्हणाले कि, ” मतदारसंघात असताना भूक लागल्याने मीहि जळगावमधील राहुल हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांसोबत मिसळ खाल्ली… एकाच मिसळमध्ये पोट भरल्याने ‘३५’ मिसळ खाण्याच्या केवळ कल्पनेनेच कसंतरी झालं.

आपण मिसळ खाल्ली आणि त्याचे पैसे देखील भरले आहेत असाही आवर्जून उल्लेख करत त्यांनी पुन्हा भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. मध्यंतरी देशाचे रेल्वे मंत्री आणि त्यांचे सहकारी मुंबईमध्ये आले होते. तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तब्बल २५० पेक्षा जास्त वडापाव खालले होते परंतु त्याचे पैसे भरायला ते विसरले, यावरून पण रोहीत पवार यांनी भारतीय जनता पक्षावर मिसळ खातानाचा फोटो ट्विट करत निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!