🕒 1 min read
पुणे: महिला काँग्रेसच्यावतीने (Congress) आज पुण्यात आयोजिलेल्या ‘लडकी हूं, लड सकती हूं” या आंदोलनात कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकूर सहभाग घेतला. महाराष्ट्र राज्य आपले चौथे सुधारित आणि अद्ययावत महिला धोरण लवकरच जाहीर करणार आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी दिली.
यशोमती ठाकूर यावेळी म्हणाल्या, राज्यात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार स्थापन झाल्यापासून केंद्र आणि राज्यात जणू सासू-सुनेचे भाडण रोज सुरू आहे. केंद्रातील लोकशाही विरोधी भाजपप्रणीत सरकारने देशभरात माजलेली अनागोंदी, अस्थिरता, महागाई याविरोधात संघर्ष करायचा आहे. हे जुलमी सरकार उलथवून टाकण्याची ताकद कोणामध्ये असेल तर ती महिलांमध्ये आहे, असं ठाकूर म्हणाल्या.
पुढे बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या, संसाराचा गाडा ओढत असताना महिला समाज घडवत असतात, त्याच महिला आता देश घडल्याशिवाय राहणार नाहीत. ‘लडकी हूं, लड सकती हूं’ हा नारा आता परिवर्तन घडवल्याशिवाय राहणार नाही, असा ठाम विश्वास यशोमती ठाकूर यांनी दाखवला आहे.
महत्वाच्या बातम्या:
‘जिल्हा बँकांनी साखर करखान्या व्यतिरिक्त उत्पन्नाचे साधन शोधावे’; शरद पवारांचा सल्ला
‘जय भवानी ही घोषणा सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली’ – अॅड. प्रकाश आंबेडकर
‘नागरिकांनी लसीकरण केल्यास चौथ्या लाटेचा धोका नाही’ – आरोग्यमंत्री राजेश टोपे
‘सत्ताधाऱ्यांनी ३ कोटी धनगर समाजाच्या तोंडावर बोळा फिरवण्याचं काम केलंय’ – गोपीचंद पडळकर


