Share

समालोचन करताना सुनील गावस्कर यांनी साधला रवी शास्त्री आणि विराट कोहलीवर निशाणा 

Published On: 

जयपूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेली तीन सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका ही टीम इंडिया ( team india ) साठी एका नव्या युगाची सुरुवात असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या सामन्यात कॉमेंट्री करत असताना टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर ( sunil gavskar )यांनी माजी टी-२० कर्णधार विराट कोहली (virat kohli ) आणि माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (ravi shashtri) यांच्यावर निशाणा साधला आहे.

मालिकेतील दुसऱ्या सामन्यात हर्षल पटेलने टीम इंडियात पदार्पण केले आणि त्याला माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरने पदार्पण कॅप दिली. दरम्यान, गावस्कर समालोचन करताना म्हंटले की, ‘माजी मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी माजी क्रिकेटपटूंकडून डेब्यू क्रिकेटपटूंना कॅप्स मिळवून देण्याचे काम सुरू केले, परंतु शास्त्री आणि कोहली यांनी ते पुढे नेले नाही.

गावस्कर म्हणाले की, ‘शास्त्री आणि कोहलीच्या राजवटीत हे पाहिले गेले नाही, तर राहुल द्रविड आणि रोहित शर्मा यांनी ही परंपरा पुढे चालवली आहे. या मालिकेत टीम इंडियासाठी दोन खेळाडूंनी पदार्पण केले आहे. व्यंकटेश अय्यरने पहिल्या सामन्यात पदार्पण केले, तर हर्षलने दुसऱ्या सामन्यात पदार्पण केले. या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून भारताने २-० अशी आघाडी घेतली. मात्र, गावस्कर यांची ही टिप्पणी चाहत्यांना फारशी आवडली नाही. द्रविड आणि रोहितची स्तुती योग्यच आहे, मात्र शास्त्री आणि कोहली यांना अशा प्रकारे टार्गेट करणे चुकीचे असल्याचे चाहत्यांनी म्हंटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!