मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(devendra fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या नेहमीच चर्चेत असतात ते आपल्या गाण्यांमुळे ! त्यांच्या काही वक्तव्यांमुळे देखील त्या अनेकदा चर्चेत आल्या आहेत. याचमुळे त्यांना अनेकदा ट्रोल देखील केलं गेलं आहे. मात्र, ट्रोलर्सना भाव न देता त्यांनी आपली कला जोपासणार असल्याचं वेळोवेळी सांगितलं आहे. यानंतर आता अमृता फडणवीस यांचे एक नवे गाण प्रदर्शित झाले आहे.
अमृता फडणवीस दरवेळी एका वेगळ्या स्वरूपाचे गाण त्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत असतात. या वर्षी गणेश उत्सवानिमित्त गाणं त्यांनी गायल होत. तर अमृता फडणवीसांनी ‘तिला जगू द्या’ हे गाणे सोशल मीडियावर भाऊबीजेनिमित्त शेअर केले होते. तेव्हा देखील त्यांना ट्रोल करण्यात आले. तर यावेळीही त्यांच्या नव्या गाण्यावरून असेच काहीसे होत असल्याचे चित्र दिसत आहे.
Admist the ongoing Heated Political Times,
take a Chill Pill with this Kool song !Lyrics by – Dev#AnniversarySpecial
Inspired by #ManikeMageHithe of Internet sensation #Yohani#HindiVersionOfManikeMageHithe pic.twitter.com/ibEazo7gUH— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) November 19, 2021
१८ नोव्हेंबर रोजी ट्वीट करत अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केले होते. यावरून अनेकांनी त्या नव गाण घेऊन येणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. ‘आओ कुछ तुफानी करते है कल शाम…मी पुन्हा येत आहे’, असं ट्विट अमृता फडणवीसांनी केले होते.
त्यानंतर काल रात्री त्यांनी नव्या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. अमृता फडणवीस यांनी योहानीने गायलेल्या ‘मानिके मागे हिते’ या गाण्याचे हिंदी रिमेक केले आहे. सध्या त्यांच्या गाण्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- सत्य, न्याय आणि अहिंसेचा विजय झाला- सोनिया गांधी
- ‘एसटीच्या खासगीकरणाचा सध्या विचार नाही, पण याला ‘हा’ एकच पर्याय उपलब्ध’
- ‘नाना पाटोलेंचे मानसिक संतुलन बिघडले’
- पेन्शन पासून वंचित पात्र स्वातंत्र्य सैनिकांना न्याय द्या; सामाजिक संघटनांचे ठाकरे सरकारला साकडे!
- कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय नाईलाजाने; चंद्रकांत पाटलांची खंत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

