Share

“ज्या ज्या भागात हिंदू अल्पसंख्य होतील, तिथे तिथे..’ शरद पोंक्षेंची पोस्ट चर्चेत

Published On: 

मुंबई : ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट अजूनही सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. अशातच ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी या चित्रपटाच्या विषयावरून फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतेय. ते म्हणाले, ‘ज्या ज्या भागांत हिंदू अल्पसंख्य होतील, तिथे तिथे काश्मीर फाईल्स तयार होईल. हे लक्षात ठेवा,’ अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे. काही तासांपूर्वी केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस पडत आहे. या कमेंट्समध्येही दोन गट पडले आहेत. काहींनी शरद पोंक्षेंच्या या पोस्टचं समर्थन केलंय, तर काहींनी ही पोस्ट अजिबात पटली नसल्याचं मत मांडलंय.

जिथे हिंदू अल्पसंख्याक होतील तिथे काश्मीर फाईल्स तयार होईल म्हणे. मग जिथे जिथे हिंदू बहुसंख्यांक आहेत आणि इतर जाती समूह अल्पसंख्याक आहेत, त्यांचं काय? मग अशा किती फाईल्स घडल्या आहेत याचा हिशोब करत बसायचा का त्यांनी,’ असा सवाल एकाने केला आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ हा सिनेमा हिंदू-मुस्लिम वादावर हिंदूंची बाजू मांडणारा किंवा मुस्लिमांच्या विरोधात बोलणारा नाहीये. तो फुटीरतावादी, दहशतवादी विरुद्ध हिंदू असा आहे. त्यामुळे या फिल्मच्या बाजूच्या आणि विरोधातल्या दोन्ही लोकांनी त्याची अशी मांडणी करू नका, असं दुसऱ्याने लिहिलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!