🕒 1 min read
मुंबई: लखनऊ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक गौतम गंभीरने खेळाडूंना मोठा सल्ला दिला आहे.संघाच्या नावाच्या लॉन्चिंगवेळी गौतम गंभीरने एक मोठी गोष्ट सांगितली. त्याला संघातील खेळाडू कसे हवे होते ते सांगितले. लखनऊ सुपर जायंट्समध्ये केएल राहुलशिवाय मार्कस स्टॉइनिस आणि लेगस्पिनर रवी बिश्नोई यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. या नवीन संघासाठी आयपीएल २०२२ चा हा पहिला हंगाम असेल. अशा परिस्थितीत संघाचे मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर आणि संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीर आयपीएलचे जेतेपद पटकावण्यात कोणतीही कसर सोडणार नाहीत.
गौतम गंभीरने (gautam gambhir) संघात सहभागी होणाऱ्या खेळाडूंना संदेश दिला आहे. आयपीएलमधून टीम इंडियात प्रवेश करू इच्छिणाऱ्या खेळाडूंनी संघात सहभागी होऊ नये, असे त्याचे मत आहे. गौतम गंभीर म्हणाला, “मला संघात असा खेळाडू नको आहे जो लखनऊ व्यासपीठाचा वापर करून टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्याचे स्वप्न पाहत आहे. कोणत्याही खेळाडूने असा विचार केला तर तो फ्रँचायझीशी अप्रामाणिक ठरेल. पण जर तुम्ही लखनऊसाठी खेळलात आणि त्यासाठी चांगली कामगिरी केली तर तुम्ही टीम इंडियापर्यंत पोहोचू शकता.”
आयपीएल हे टीम इंडियात स्थान मिळवण्याचे व्यासपीठ नाही, असे गौतम गंभीरचे मत आहे. आयपीएल हे टीम इंडियामध्ये खेळण्याचे व्यासपीठ नाही. आयपीएल हे संपूर्ण जगाला तुमची प्रतिभा दाखवण्याचे व्यासपीठ आहे. खेळाडूंनी असा विचार केला पाहिजे, जर तुम्ही लखनऊसाठी खेळलात आणि त्यासाठी चांगली कामगिरी केली तर तुम्ही टीम इंडियापर्यंत पोहोचू शकता. लखनऊ सुपर जायंट्स संघ केएल राहुलच्या नेतृत्वाखाली प्रगती करेल. नवीन संघाला पुढे नेणे हे त्यांच्यासाठी मोठे आव्हान असल्याचे देखील गंभीरने सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
- “देश हादरून जाईल अशी प्रकरण…”- संजय राऊतांचा भाजपवर निशाणा
- IPL मुळे एका रात्रीत बदलले ‘या’ खेळाडूचे जीवन; कधीकाळी २०० रुपयांसाठी खेळायचा!
- “सिलेक्टिव्ह कारवाई करायची असेल तर…” – सुप्रिया सुळेंचा मोदींना सवाल
- कपिल शर्मा पुन्हा एकदा ट्रोल! ‘नरेंद्र मोदींचे कौतूक करायला किती पैसे घेतलेस?’ नेटकऱ्यांचा प्रश्न
- IPL 2022 : “त्याच्याकडं अविश्वसनीय…”, ऑस्ट्रेलियाचा शेन वॉटसन झाला पृथ्वी शॉचा फॅन!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
