मुंबई : शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान ही लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक आहे. सुहाना ही सोशल मीडियावर सक्रिय सतत सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात असते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये सुहाना एका मिस्ट्री बॉयसोबत दिसत आहे.
https://www.instagram.com/p/CbaFblsok2p/?utm_medium=copy_link
सुहाना परदेशात तिचं शिक्षण पूर्ण करून भारतात परतली आहे. यावेळी सुहानासोबत तिचा एक मित्र देखील आहे. या दोघांचा मन्नत बंगल्या बाहेर कारमध्ये स्पॉट करण्यात आले. त्या दोघांनी फोटोग्राफर्सना पाहिल्यानंतर स्वत: चा चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे हा सुहानाचा बॉयफ्रेंड आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे. सुहानाचे हे फोटो सेलिब्रिटी फोटोग्राफर वरिंदर चावलाने शेअर केले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

