Share

साध्वी प्रज्ञासिंग, कर्नल पुरोहित यांना तुरुंगात डांबणे हा ईडीचा सदुपयोग होता का?; भातखळकरांचा शरद पवारांना सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. ईडीने पुष्पक ग्रुपच्या (ED action taken against Pushpak Group) ६ कोटी ४५ लाख रुपयांच्या मालमत्तेची चौकशी केली आहे. त्यात रश्मी ठाकरे यांचे सख्खे भाऊ श्रीधर पाटणकर  (Sridhar Patankar) यांच्या ठाण्यातील नीलंबरी प्रकल्पातील ११ सदनिकांना टाळे ठोकण्यात आले आहे. यावरच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर देशासमोरील मोठा प्रश्न असल्याचे म्हटले होते. यावरच आता भाजप नेते अतुल भातखळकर (atul bhatkhalkar) यांनी शरद पवारांना सवाल केला आहे.

‘केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर देशासमोरील मोठा प्रश्न’ असे पाटणकरांवरील कारवाईनंतर शरद पवार म्हणाले आहेत. अस्तित्वात नसलेल्या हिंदू दहशतवादाचा बागुलबुवा उभा करून साध्वी प्रज्ञासिंग, कर्नल पुरोहित यांना वर्षांनुवर्षे तुरुंगात डांबणे हा केंद्रीय तपास यंत्रणांचा सदुपयोग होता का? असा सवाल अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत शरद पवारांना केला आहे.

दरम्यान या कारवाई नंतर भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. तर मविआ नेत्यांनी याला भाजपचे सुडाचे राजकारण म्हटले आहे. आतापर्यंत यावर शिवसेना खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई तसेच नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. राज्यात सध्या या कारवाईनंतर राजकारण तापले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!