🕒 1 min read
नवी दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना ईडीने जोरदार दणका दिला आहे. पाटणकर यांच्या ठाण्यातील 11 सदनिका ईडीने जप्त केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल केला आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देश सुधारायचा असेल, भ्रष्टाचार नष्ट करायचा असेल तर त्यांचं मी स्वागत करते, पण असं सिलेक्टिव्ह लोकांविरोधात कारवाई करायची असेल तर याला आम्ही साथ देणार नाही, ED ची रेड करायची असेल तर सगळ्याच पक्षांवर करा”. बीजेपीवाल्यांवर जेव्हा आरोप होतात, त्यानंतर ते बीजेपीत येतात. मग त्यांची कारवाई कशी थांबते? असा सवाल दिल्लीत पत्राकारांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी मोदींना केला.
यासह ठाकरे कुटुंबाला याप्रकरणी पूर्ण मदत करणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या, ‘ठाकरे कुटुंब आणि पवार कुटुंबाचे 55 वर्षांचे ऋणानुबंध आहे. बाळासाहेब आणि पवार साहेबांचेही मैत्री आणि आदराचे संबंध आहेत. पुढील 100 वर्षेही राहतील. कोणाच्याही घरात अन्याय होतो, तेव्हा पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत आणि यापुढेही असतील.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
