औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यात औरंगाबादकर यशस्वी झाले आहेत. शहराचा पॉझिटिव्हीटी रेट २.२६ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. मात्र या सर्वांमध्ये कडक निर्बंध, लसीकरण, ब्रेक द चेन, लॉकडाऊन, प्रशासनाच्या उपाययोजना यांचा मोलाचा वाटा राहिला. आता प्रशासनाने काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र या दोनच दिवसात बाजारपेठा तुडुंब भरल्या, रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली. यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र या गर्दीवर कारवाई करणारे मनपा आणि जिल्हाधिकारी यांचे संयुक्त पथक कुठेही कारवाई करताना दिसून आले नाही.
शहरात मार्च महिन्यापासून अचानकच रुग्ण संख्या वाढण्यास सुरुवात झाली. घराघरात बाधित रुग्ण आढळून येत होते. रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट ३३ टक्क्यांवर गेला होता. मात्र प्रशासनाने होम आयसोलेशनची सुविधा उपलब्ध करुन दिली. कोविड सेंटर पुन्हा सुरु करण्यात आले. तपासणी, कडक निर्बंध, ब्रेक द चेन या सर्व उपाययोजनांमुळे बाधितांचे प्रमाण हळूहळू कमी होत गेले. सध्या एकुणच शहरात दिलासादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्यस्थितीत शहरात मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या ओसरल्याने निर्बंधांमध्ये शिथिलता आणत बाजारपेठा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
मात्र गेल्या दोनच दिवसात शहरात निर्माण झालेली गर्दी पाहता पुन्हा एकदा तिसऱ्या लाटेची धोक्याची घंटा वाजत आहे. विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईसाठी शहरात नागरी मित्र पथक स्थापन करण्यात आले आहे. तसेच विशेषतः गर्दीची ठिकाणे, बाजारपेठा यांवर कारवाईसाठी जिल्हाधिकारी यांची दोन पथके व मनपाचे १ पथक तैनात करण्यात आले आहे. मात्र गेल्या दोन दिवसात अधिक सक्रिय होऊन कारवाईची आवश्यकता असताना हे पथक कुठेही फिरकले नसल्याचे समजते.
नागरी मित्र पथकाच्या १० टीम शहरात विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करत असते. तसेच गर्दीच्या ठिकाणांवर कारवाईसाठी जिल्हाधिकारी यांचे दोन आणि मनपाचे एक असे तीन पथक मिळून कारवाई करत होते. मात्र १ जूनपासून हे पथक विभक्त करण्यात आले आहेत. दोन दिवसात शहरात जास्त कारवाई करु शकलेलो नाही. येणाऱ्या काळात तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अधिक सक्रिय होत कारवाई करु. अशी प्रतिक्रिया नागरी मित्र प्रमुख प्रमोद जाधव यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- शिवसेनेचा राष्ट्रवादीला गंभीर इशारा अन् फडणवीसांनी केला ‘त्या’ विधानाचा पुनरुच्चार
- …तर पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्याला आमचा पूर्ण पाठींबा असेल – संजय राऊत
- शेतकऱ्यांना वेळेत कर्जाची उपलब्धता केलीच पाहिजे, अजितदादांनी भरला दम
- पंजाबमध्ये अमरिंदर सिंह विरुद्ध सिद्धू वाद चिघळला; निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये घमासान
- नारायण राणेंनी संभाजीराजेंवर केलेली टीका योग्य नाही – फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
