मुंबई : खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यात धमक दिसत नाही. ते राजे आहेत म्हणून त्यांना खासदारकी दिली. मात्र ते राजे असतील तर रयत दिसली पाहिजे ना आजूबाजूला. ती कुठे दिसत नाही, अशी टीका भाजप नेते व खासदार नारायण राणे यांनी गुरुवारी केली होती. संभाजीराजे हे भाजपमधील खासदार असून देखील नारायण राणे यांनी जाहीरपणे केलेल्या टीकेमुळे चर्चांना उधाण आलं आहे.
यावर संभाजीराजे यांनी देखील चोख प्रत्युत्तर दिलं असून आता माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या वादात मध्यस्थी केली आहे. यासोबतच, महाविकास आघडीतील काही नेते मुद्दामून संभाजीराजेंबाबत असं मत पसरवत असल्याची टीका देखील फडणवीसांनी केली आहे. ‘जाणीवपूर्वक संभाजीराजेबाबत वेगवेगळ्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. नारायण राणेंनी त्यांच्याबाबत असं विधान का केलं हे मला माहित नाही. यासंदर्भात मी त्यांच्याशी चर्चा करेन. मात्र, संभाजीराजेंवर केलेली टीका योग्य नाही,’ अशी टिप्पणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
संभाजीराजेंचा नारायण राणेंना प्रत्युत्तर –
‘छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही तर न्याय देणे आहे. आणि ताकतच पहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू. ताकद दाखविण्यासाठी लोकांचे जीव घेणे योग्य नाही त्यापेक्षा लोकांचे जीव कसे सुरक्षित ठेवता येतील हे महत्त्वाचे आहे, कारण माझा वारसा शिवशाहूंच्या विचारांचा आहे,’ अशा शब्दांत संभाजीराजे यांनी राणेंचं नाव न घेता इशारा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘राष्ट्रवादीचा ‘तो’ आमदार अजितदादांचे ऐकत नसेल तर आम्हीच त्याचा बंदोबस्त करतो’
- मोठी बातमी : ‘…आता ठिणगी पडलीये’; संजय राऊतांचा राष्ट्रवादीला गंभीर इशारा
- शेतकऱ्यांना वेळेत कर्जाची उपलब्धता केलीच पाहिजे, अजितदादांनी भरला दम
- पंजाबमध्ये अमरिंदर सिंह विरुद्ध सिद्धू वाद चिघळला; निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये घमासान
- ‘राष्ट्रवादीचा ‘तो’ आमदार अजितदादांचे ऐकत नसेल तर आम्हीच त्याचा बंदोबस्त करतो’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
