खेड : राज्यात २०१९ विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर भिन्न विचारसरणी असलेले काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील धुसफूस अनेकदा समोर आली असून स्थानिक स्तरासह राज्यातील पुढील निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार का याबाबत कायमच उत्सुकता असते.
दरम्यान, काँग्रेसने मुंबईसह अनेक महापालिकांमध्ये स्वबळाचा नारा दिला असतानाच २०२४ च्या विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवून काँग्रेस सत्तेत येईल यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे निर्देश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत. याबाबत आता शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.
‘प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. काँग्रेसने विधानसभेऐवजी देशात सत्ता स्थापण्यासाठी प्रयत्न करावेत. काँग्रेस जर स्वबळाच्या नाऱ्यावर देशात २८५ चा आकडा गाठून केंद्रात सरकार स्थापन करत असेल तर आमचा त्यांना पूर्ण पाठींबा असेल,’ असं भाष्य संजय राऊत यांनी खेडमधील पत्रकार परिषदेत केलं आहे.
काय म्हणाले होते पटोले ?
‘काँग्रेस पक्षाला गतवैभव मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रपणे काम केले पाहिजे. उत्तर महाराष्ट्र हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता आता पुन्हा या भागातून लोकसभा, विधानसभेचे प्रतिनिधित्व वाढवून २०२४ मध्ये काँग्रेस स्वबळावर सत्तेत येईल यासाठी काम करा,’ अशा सूचना नाना पटोले यांनी काल एका पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी दिल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘राष्ट्रवादीचा ‘तो’ आमदार अजितदादांचे ऐकत नसेल तर आम्हीच त्याचा बंदोबस्त करतो’
- मोठी बातमी : ‘…आता ठिणगी पडलीये’; संजय राऊतांचा राष्ट्रवादीला गंभीर इशारा
- शेतकऱ्यांना वेळेत कर्जाची उपलब्धता केलीच पाहिजे, अजितदादांनी भरला दम
- पंजाबमध्ये अमरिंदर सिंह विरुद्ध सिद्धू वाद चिघळला; निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये घमासान
- नारायण राणेंनी संभाजीराजेंवर केलेली टीका योग्य नाही – फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
