औरंगाबाद : गेल्या दिड वर्षांपासून ओरंगाबाद मनपा कोरोनाशी लढा देत आहे. या काळात कोरोनाबरोबरच शहरातील रखडलेल्या काही विकासकामांनाही सुरुवात करण्यात आली. यात १०० कोटी, ५२ कोटीतील रस्त्यांची कामे सुरू झाली. यातील बहुतांश रस्ते तयार आहेत. मात्र कामे पूर्ण होत असतानादेखील शासनाकडून उर्वरित अनुदान मिळत नसल्याने महापालिका प्रशासन अडचणीत सापडले आहे. रस्ते, कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे तब्बल १२३ कोटी रुपये थकीत आहेत. हा निधी तातडीने मिळावा, यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे, हा निधी महापालिका गेल्या महापालिका निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला होता.
शहरातील रस्ते व कचऱ्याचा प्रश्न गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात गाजला. आर्थिक संकटामुळे महापालिकेला हे विषय मार्गी लावण्यास विलंब होत होता. त्यामुळे राज्य शासन महापालिकेच्या मदतीला धावून आले. रस्त्यांसाठी आत्तापर्यंत महापालिकेला २५, १०० व १५२ कोटींचा निधी राज्य शासनाने जाहीर केला आहे. यातील २५ कोटींच्या निधीतील सहा रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. एका रस्त्याचा निधी इतरत्र वापरण्यात आला. त्यानंतर जाहीर झालेल्या १०० कोटींमधील रस्त्यांची कामे ९० ते ९५ टक्क्यांपर्यंत पूर्ण झाली. मात्र, शासनाने आत्तापर्यंत महापालिकेला ८० कोटींचाच निधी दिला.
उर्वरित २० कोटींचा निधी रखडल्याने एक-दोन रस्ते रखडले आहेत. तसेच थकीत बिले मिळावीत म्हणून कंत्राटदार महापालिकेत खेट्या मारत आहेत. यासाठी मनपा मात्र राज्य शासनाकडे बोट दाखवित आहे. दरम्यान महाविकास आघाडी सरकारने रस्त्यांसाठी नव्याने १५२ कोटींचा निधी दिला. यातील सात रस्त्यांची म्हणजेच ५२ कोटींची कामे महापालिका करीत आहे. यातील ३५ कोटी रुपयांचे अनुदान थकीत आहे. त्यामुळे रस्त्यांची कामे कासवगतीने सुरू आहेत. कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठीचा ६८ कोटी रुपयांचा निधी शासनाकडे थकीत आहे.
थकीत निधी
१०० कोटीतील रस्ते-२० कोटी
५२ कोटीतील रस्ते-३५ कोटी
कचरा प्रक्रिया प्रकल्प-६८ कोटी
मुद्रांक शुल्कापोटी- १७ कोटी
महत्त्वाच्या बातम्या
- शब्दातून नाही तर कृतीतून महिला सक्षमीकरण, आमदार श्वेता महालेंनी केला दावा
- अपघात रोखण्यासाठी iRAD अॅप! १०० पेक्षा अधिक अपघातांचे लातूरात संकलन
- औरंगाबादेत लसींचा तुटवडा, मनपा ५० हजार नागरिकांना दुसरा डोस कसा देणार?
- नारायण राणेंना केंद्रीय गृहमंत्री केलं तरी सेनेला फरक पडत नाही – वैभव नाईक
- बारावी निकालाच्या मुल्यमापन आरखड्यातील त्रुटी दुरुस्त करा, मुख्याध्यापकांची बोर्डाकडे मागणी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

